Dahi Bhindi Curry Recipe esakal
फूड

Dahi Bhindi Curry: रोजच्या भेंडी मध्ये दह्याचा तडका, एकदा चाखाल तर आयुष्यभर खाल अशी भाजी...

साध्या घरातल्या गोल भेंडी पासून, मोठमोठाल्या फाइव स्टार हॉटेल मधल्या मसाला भेंडी, भेंडी फ्राय पर्यंत सगळीकडेच भेंडी अगदी आवडीने खाल्ली जाते

Lina Joshi

Dahi Bhindi Curry Recipe : घरात प्रत्येकाच्या आवडत्या भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे भेंडी. साध्या घरातल्या गोल भेंडी पासून, मोठमोठाल्या फाइव स्टार (hotel style recipe) हॉटेल मधल्या मसाला भेंडी, भेंडी फ्राय पर्यंत सगळीकडेच भेंडी अगदी आवडीने खाल्ली जाते. आपण youtube वरती सुद्धा किती तरी प्रकारच्या भेंडीच्या भाजीची रेसिपी बघितली असेल.

जसं की गोल भेंडी, भरली भेंडी, भेंडी फ्राय, पंजाबी स्टाइल भेंडी, ग्रेवी भेंडी आणि अशा भरपूर. भेंडीची भाजी हा एक असा पदार्थ आहे जो केला आणि जमला तर खूप छान जमतो आणि नाही जमला तर झालं. (how to make Dahi Bhindi Curry)

म्हणून तर किचनमध्ये नवीन नवीन शिरलेले लोकं भेंडीची भाजी ट्राय करत नाही. भेंडीची भाजी करतांना अनेक प्रॉब्लेम येतात जसे की भेंडी तार सोडू लागते किंवा शिजतच नाही किंवा खूप कडक होते. त्यामुळे तशी भेंडीची भाजी करणं हे स्वतःतच एक मोठं आव्हान आहे.

आता हे आव्हान स्वीकारलं आहेच तर त्यात जरा ट्विस्ट आणूयात. तुम्ही वरती सांगितल्या पैकी अनेक रेसिपी घरी ट्राय केल्या असतीलच. पण कधी भेंडीची भाजी (yummy bhindi sabji) आणि दही ट्राय केलं आहे? ही रेसिपी जरा हटके असली तरी खूप टेस्टी आहे आणि याची शंभर टक्के गॅरेंटी की तुम्हाला ही खूप आवडेल.

खरंतर ही रेसिपी तुमच्या घरातल्या प्रत्येकाला विशेषतः मुलांना खूप (tasty recipe for kids) आवडेल आणि सगळेच परत परत हीच भाजी कर म्हणून हट्ट देखील करतील. चला तर मग बघूया ही भाजी नक्की कशी करायची ते? (Dahi Bhindi Curry Recipe in Marathi)

या भाजीच नाव दही भेंडी करी असं आहे. ही भाजी अर्थात नावावरून कळलं असेलच पण तरीही पंजाबी स्टाइलची आहे. चला बघूया यासाठी साहित्य काय काय लागतात ते (hotel style Dahi Bhindi Curry Recipe at home)

दही भेंडी करी (Dahi Bhindi Curry)

साहित्य (Ingredients):

भेंडी - अर्धा किलो

दही - 1 कप

धणे पावडर - 2 टीस्पून

मिरची पावडर - 2 टीस्पून

बेसन - 1/2 टीस्पून

हिंग - 1/8 टीस्पून

कडीपत्ता (पाने) - 5 ते 7

तेल - 1 टीस्पून

जिरे - 1 टीस्पून

मोहरी - 1 टीस्पून

बडीशेप - 1 टीस्पून

मीठ - चवीनुसार

दही भेंडी करी (Dahi Bhindi Curry)

तयार करण्याची पद्धत (Recipe):

सर्वात आधी भेंडी नीट धुवून चाळणीत ठेवा आणि पाणी नितरेपर्यंत वाळवा किंवा कापडाने पुसून टाका.

भेंडीच्या दोन्ही बाजूंचे देठ काढून टाका. भेंडीचे उभे काप कापून घ्या किंवा गोल १/२ किंवा ३/४ इंच तुकडे करा.

कढईत तेल गरम करा, तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, जिरे आणि मोहरी टाका, जिरे भाजल्यानंतर त्यात हळद, हिरवी मिरची, धणेपूड आणि दही घालून मिक्स करा.

मसाले हलके तळून झाल्यावर त्यात भेंडी, मीठ, लाल तिखट आणि बडीशेप टाकून मिक्स करा.

भाजीला झाकण ठेवून मंद आचेवर ३-४ मिनिटे शिजू द्या, मग तपासा.

मधेच भाजी ढवळत राहा म्हणजे मसाले भाजीत चांगले मिसळतील. भिंडी शिजायला 8-10 मिनिटे लागतात.

भेंडीची भाजी तयार आहे, त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि मिक्स करा.

गॅस बंद करून भाजी प्लेटमध्ये काढून कोथिंबिरीने सजवा. चपाती, पराठा, पुरी किंवा भाताबरोबर दही भेंडी करी सर्व्ह करा आणि खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT