Kaju Katli Sakal
फूड

Diwali Recipes 2023 : धनत्रयोदशी निमित्त घरीच बनवा सगळ्यांना आवडणारी काजूकतली, ही आहे सोपी रेसिपी

धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही देवाला काजू कतलीचा नैवेद्य दाखवू शकतात.

Aishwarya Musale

दिवाळी सण हा सर्वांचा आवडीचा सण. हा सण काही दिवसांवर आलाय. दररोज देवाला नवीन काहीतरी नैवेद्य काय करावं या विचारात तुम्ही असाल. धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही देवाला काजू कतलीचा नैवेद्य दाखवू शकतात.

धनत्रयोदशीला धणे आणि बत्तासे ठेवून भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. अशा वेळी नैवेद्य म्हणून तुम्ही तुमच्या हाताने बनवून देवाला काजू कतलीचा नैवेद्य दाखवू शकतात.

काजू कतली ही एक पारंपरिक आणि घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या प्रत्येकाला आवडते आणि आपल्या आरोग्यासाठीही चांगली जाते.

दिवाळीचा फराळ हा शक्यतो घरीच बनवायला सुरुवातही झाली असेल. लाडू, चकली चिवडा सर्व पदार्थ घरीच बनवतात. त्यात तेच तेच पदार्थ खायला नकोसे वाटतात.

काजू कतली प्रसिद्ध मिठाईंपैकी एक आहे. अशावेळी घरच्या घरीच काजू कतलीही बनवू शकता. अनेकांना काजू कतली खूप आवडते. चला तर मग काजू कतलीची रेसिपी जाणून घेऊयात.

काजू कतली बनवण्यासाठी साहित्य

काजू - २ वाटी

साखर - १ वाटी (चवीनुसार)

गाईच तूप - ४ चमचे

वेलची पावडर - १/२ चमचे

काजू कतली कशी बनवायची

आधी काजूचे काप करून घ्या आणि सर्व काजू मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. यानंतर, काजू पावडर चाळणीत टाकून चाळून घ्या. जेणेकरून काजूचे जाड तुकडे यात राहणार नाही. हे जाड तुकडे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून चाळून त्या पावडर मध्ये मिक्स करा.

एका पातेल्यात साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. काही वेळाने साखर पाण्यात चांगली मिसळली की त्यात काजू पावडर घालून मिक्स करा आणि गॅस बारीक करा.

हे काजूचे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. त्यात मिश्रणात वेलची पावडर आणि तूप घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा. .

आता एक प्लेट किंवा ट्रे घ्या आणि त्याच्या तळाशी तूप चांगले लावा. आणि तयार केलेली पेस्ट प्लेटमध्ये ठेवा आणि ती फिरवत राहा जेणेकरून पेस्ट लवकर थंड होईल.

पेस्ट थोडी गरम राहिली की बटर पेपरवर थोडं तूप लावून घ्या. या सारणाचे हाताने मोठे मोठे गोळे करून बटर पेपर वर पसरवून घ्या तुम्ही यासाठी लाटण्याचीही मदत घेऊन शकतात.

त्यानंतर सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. काजू कटलीचे मिश्रण सेट झाल्यानंतर चाकूच्या मदतीने हिऱ्याच्या आकारात कापून घ्या. आता तुमची स्वादिष्ट काजू कतली तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT