Diwali Recipe 2023 esakal
फूड

Diwali Recipe 2023 : धनत्रयोदशीला दाखवा ‘या’ २ पदार्थांचा खास नैवेद्य, एकदम सोपी आहे रेसिपी

धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना खास नैवेद्य दाखवला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Recipe 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशीचा सण आहे. आजच्या दिवसाचे महत्व ही खास आहे. आजच्या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा आवर्जून केली जाते.

ही पूजा केल्यानंतर त्यांना खास नैवेद्य दाखवला जातो. आज या धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्ही देखील नैवेद्य दाखवा. त्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. परंतु, आजच्या दिवशी गूळ, तूप आणि तांदूळ यांचे खास महत्व आहे. त्यामुळे, या गोष्टींचा वापर करून तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता.

चला तर मग खास धनत्रयोदशीच्या नैवेद्यासाठी आपण तांदळाची खीर आणि गुळाच्या लापशीची रेसिपी जाणून घेऊयात.

तांदळाची खीर :

साहित्य

  • तांदूळ

  • दूध

  • ड्रायफ्रूट्स

  • साखर

  • केशर

तांदळाची खीर बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ भिजवा.

  • त्यानंतर, तांदळाची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा.

  • आता दूध गरम करायला ठेवा.

  • दूधाला उकळी आली की, त्या दूधामध्ये तांदळाची पेस्ट घाला.

  • आता, हे मिश्रण चांगले शिजू द्या.

  • मिश्रण चांगले शिजल्यानंतर, त्यात चिमूटभर केशर आणि साखर घाला.

  • आता खीर चांगली शिजल्यानंतर त्यात ड्रायफ्रूट्स घाला.

  • आता गॅस बंद करा आणि तुमची तांदळाची खीर तयार आहे.

लापशी

लापशी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ कप लापशी

  • तूप

  • गूळ

  • २ कप पाणी

  • ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, पिस्ताचे बारीक काप करून घ्या)

  • वेलची पूड किंवा वेलची

  • खोबऱ्याच्या वाटीचे बारीक तुकडे

लापशी करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी कुकर किंवा खोलगट कढईमध्ये तूप घालून ती गरम करायला ठेवा.

  • आता या तूपात ड्रायफ्रूट्सचे केलेले बारीक काप आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे छान भाजून घ्या.

  • हे सर्व भाजून घेतल्यानंतर ते एका भांड्यात काढून ठेवा.

  • आता कुकर किंवा कढईमध्ये थोड तूप घालून त्यात लापशी परतून घ्या.

  • आता त्यात पाणी घाला.

  • १५ मिनिटांनी त्यात वेलची आणि चिमटूभर केशर मिसळा.

  • आता कुकरचे झाकण बंद करून लापशी चांगली शिजू द्या.

  • ३ शिट्ट्या काढल्यानंतर कुकरचे झाकण काढा.

  • आता या लापशीमध्ये थोडा गूळ घालून मिश्रण चांगले शिजू द्या.

  • आता, या लापशीमध्ये खोबऱ्याचे तुकडे, ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा कुकरचे झाकण लावा.

  • आता १५-२० मिनिटे लापशी शिजू द्या. आता तुमची लापशी तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT