besan ladu esakal
फूड

Diwali Festival 2021: स्वादिष्ट बेसन लाडू, वाचा रेसिपी

सकाऴ वृत्तसेवा

दिवाळीत सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे 'बेसन लाडू'.

दिवाळी सण हा सर्वांचा आवडीचा सण. हा सण काही दिवसांवर आलाय. अशावेळी प्रत्येक घरात फराळ बनवण्यासाठी घाई सुरु होते. यावेळी फराळामध्ये करंजी, बेसन लाडू, रवा लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, शेव, अनारसे, असे अनेक पदार्थ बनवले जातात. पण दिवाळीत सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे 'बेसन लाडू'. चला तर जाणून घेऊया स्वादिष्ट बेसन लाडूची सोपी रेसिपी.

साहित्य:

- डाळीचे थोडेसे पीठ- चार वाट्या

- साजूक तूप किंवा वनस्पती तूप- दीड वाटी

- पिठीसाखर- साडेतीन वाट्या

- ड्रायफ्रुट्स

- एक चमचा उकळते दूध-अर्धी वाटी

कृती: सुरवातीला तूप किंवा डालड्यामध्ये बेसन तांबूस रंगामध्ये खमंग भाजून घ्या. भाजून झाल्यावर त्यात अर्धी वाटी उकळते दूध घाला. पीठ फसफसत असताना जाळीदार होऊन वर येईल. त्यानंतर पीठ कोमट झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलदोडा पूड घालून चांगले मळा. त्यामुळे लाडू चांगले मऊ होतात. लाडू वळताना त्यावर काजू पाकळी व बेदाणा लावून वळा.

टीप: याप्रमाणेच नाचणीच्या पिठाचे लाडू करता येतात. उन्हाळ्यात तब्येतीला हे लाडू चांगले असतात. लहान मुले, आजारी माणसे यांना पथ्याचे असतात. हे लाडू वनस्पती तुपात न करता साजूक तुपातच करावेत.

(संदर्भ: पुस्तक- मराठी सण...मराठी रेसिपी, सकाळ प्रकाशन, लेखिका-अश्विनी अजित डिके)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

SCROLL FOR NEXT