Crispy Chivda Esakal
फूड

Diwali Recipe: घरच्या घरी गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा कसा तयार करायचा?

गव्हाचा चिवडा हा पौष्टीक आणि खुसखुशीत लागतो.

सकाळ डिजिटल टीम

आपण दिवाळी स्पेशल खास पारंपरिक पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील सहावी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल घरच्या घरी गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा कसा तयार करायचा?

साहित्य :

एक किलो स्वच्छ गहू 

चवीनुसार मीठ 

पापडखार मीठाच्या प्रमाणात

एक वाटी शेंगदाणे 

कढीपत्ता

बारीक चिरलेली हिरवी मिरची

लसुण

जीरं

मोहरी

हळद 

तिखट

कृती:

प्रथम एक किलो स्वच्छ निवडलेला गहू एक रात्रभर भिजवावा. दुस-या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात 4 ते 5 शिट्यांवर शिजवावा. यात काळजी एकच घ्यायची की, गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त गव्हाचे दाणे उलेपर्यंत शिजवायचा आहे. कुकरमधील गहू 3 ते 4 वेळा थंड पाण्यातून काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरलेले पाणी काढून त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळून ठेवावे. नंतर हे गहू कपडयावर पसरवून कडक उन्हात वाळवावे. वाळवलेले गहू कोरड्या आणि स्वच्छ डब्यात भरून ठेवावेत. हे असे वर्षभर राहू शकतात. नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढून  कोरड्या कढईत भाजून घ्यावेत. असे भाजत असताना त्यात तेल टाकू नये. आता चिवडा बनवतांना आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळून घ्यावेत. लसूण बारीक चिरून तोही खरपूस तळून घ्यावा. हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरून तळून घ्यावी. यानंतर एका कढईत फोडणीसाठी तेल ठेवून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, तिखट टाकून त्यात हे भाजलेले गहू परतून घ्यावेत. अशा रितीने आपला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT