फूड

Diwali Recipes : दिवाळीनिमित्त पारंपारिक पद्धतीने बनवा रंगीत कानवले

दिवाळी जवळ आली की सगळ्यांच्याच घरात फराळ बनवण्याची लगबग

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी जवळ आली की सगळ्यांच्याच घरात फराळ बनवण्याची लगबग सुरू होते; या दिवाळीच्या फराळात काही ठरलेले पारंपरिक पदार्थ जसे की चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे, शेव हे आणि काही आपली हौस म्हणून केलेले पदार्थ असतात.

पण याच पारंपरिक पदार्थांमध्ये आणखीन एक पदार्थ येतो तो म्हणजे कानवले. या कानवल्यांना काही लोक करंजी देखील म्हणतात. लहानपणी आई जेव्हा जेव्हा कानवले करायची त्याचा अर्धा चंद्रासारखा आकार तुम्हालाही अट्रॅक्ट करत असेल ना? मग चला आज तेच कानवले बनवूयात आणि तेही वेगवेगळ्या रंगात.

कानवले बनवण्यासाठी साहित्य-

कानवल्याच्या कणकेसाठी: 3/4 कप बारीक रवा, 1/2 वाटी दूध आणि पाणी मिसळून, 4-6 चमचे तूप,

पाळ्यांमध्ये लावण्यासाठी लागणारी कॉर्न फ्लॉवर पेस्ट: 2 चमचे तूप, 3 चमचे कॉर्न फ्लोअर

कानवल्याच्या सारणासाठी साहित्य: 1 वाटी सुके कापलेले खोबरे, पिठी साखर, 2 चमचे पांढरे खसखस, ¼ चमचे वेलची पूड, ¼ चमचे जायफळ पावडर, तूप

प्रक्रिया:

कढईत तुपात गव्हाचे पीठ रंग बदलून लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या. एका पॅनमध्ये खोबऱ्याचा किस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. मग खसखस भाजून घ्या. थंड झाल्यावर दोघेही मिक्सरमध्ये ​​बारीक करा. हे सारण, नारळ आणि भाजलेले गव्हाचे पीठ एकत्र करा. चवीनुसार किंवा समान प्रमाणात साखर घाला. ते थोडे जास्त गोड बनवायला हरकत नाही कारण तळल्यानंतर गोडपणा थोडा कमी होतो. त्यात जायफळ आणि वेलची पावडर घाला.

कानवल्याची कणीकेसाठी साहित्य -

रवा, दूध - पाणी आणि चिमूटभर मीठ घालून पीठ मळून घ्या. स्वयंपाकघरातल्या सुती कापडाला जरा ओलसर करून गोल्यावराती ४-६ तासांसाठी झाकून ठेवा. नंतर तुपाचा हात लावून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. या गोळ्यात तुम्हाला हवा असलेला फूड कलर मिक्स करा. आता त्या गोळ्याची पाळी लाटून त्यात करांज्यांसारख सारण घाला. तयार केलेल्या कॉर्न फ्लोअरच्या पेस्ट ने पाळी बंद करून घ्या आणि नंतर त्या तेलात तळून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT