थंडीच्या (Winter) दिवसात शरीर गरम राहावं यासाठी विविध पौष्टीक (Healthy Food) पदार्थ खाल्ले जातात. या दिवसात संक्रांत जवळ आल्यावर हमखास ज्वारी, बाजरीची भाकरी (Bhakri) केली जाते. पण ही पिठं मिक्स करून थालिपिठंही केली जातात. शिवाय या काळात पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे त्या वापरून अशी थालिपीठ करता येऊ शकतात. मेथीबाबत बोलायचे झाले तर, मेथी या काळात ताजी मिळते. तीचे परोठे हमखास केले जातात. ही मेथी बाजरीबरोबर थालिपीठासाठी वापरता येऊ शकते. तुम्ही दिवसभरात कधीही हा पदार्थ खाऊ शकता.
बाजरीचे असे आहेत फायदे
थंडीच्या दिवसात बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. बाजरीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण चांगलं असंत. दररोज ५०-२०० ग्रॅम बाजरीचं सेवन केल्याने रक्त प्रवाह सुधारतो, तसेच कोलेस्ट्रोल व ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी होऊन हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी व्हायला मदत होते. बाजरीमध्ये असलेल्या भरपूर प्रोटीन्समुळे केसांची मुळे मजबूत होतात. याशिवाय बाजरीमधल्या मॅग्नेशियमुळे पित्त कमी होते. पण तिच्या अतिसेवनामुळे ळे थायरॉईडच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाजरीच्या पीठात दुसरे घटक घालून खाल्ल्यास फायदा होतो. तसेच पौष्टीकपणा वाढतो
असे करा थालीपीठ
साहित्य- बाजरीचे पीठ २ कप, मेथी बारीक चिरून १ अप, आवडीप्रमाणे हळद, तिखट, जीरं, ओवा, तीळ आणि मीठ.
कृती- हे सगळे घटक एकत्र करून त्याचा थोडा घट्टसर गोळा तयार करायचा. डायरेक्ट तव्यावर किंवा प्लॅस्टीकवर तो थापून चांगला खरपूस भाजायचा. खरपूस भाजून झाल्यावर तो खायला तयार. मात्र खाताना लोणी आणि लोणचं याबरोबर खाल्लं तर फर्मास लागेल. मग एकदा नक्की करून बघा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.