सकाळचा नाश्ता हा आपल्या दिनचर्येचा भाग बनलाय. रोज सकाळी नाश्ता करून दिवसाची सुरुवात आपण करतो पण अनेकदा आपल्याला कोणता नाश्ता सकाळी करायला पाहिजे किंवा सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पौष्टीक गोष्टी असायला हव्यात, याविषयी फारशी कल्पना नसते आणि मग काय तर सकाळच्या नाश्त्याचं गणित बिघडतं. सोबतच सकाळचा नाश्ता केल्याने वजन जास्त वाढतं, असं म्हटल्या जाते. खरंच असं होतं का? आणि वजन वाढत असेल तर का असं होतं? विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Does eating breakfast in the morning make your weight gain?)
सकाळचा नाश्ता शरीराला उपयुक्त
खरं तर सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे आहेत. तज्ज्ञांच्या मते सकाळच्या नाश्त्यात कॅल्शियम आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं. सकाळचा नाश्ता आवश्यक पोषकतत्त्वासोबत दिवसभर उर्जा देतं
सकाळचा नाश्त्यात पौष्टीक आहार असणे गरजेचे
सकाळच्या नाश्त्यात पौष्टीक आहार असणे गरजेचे आहे. मोड आलेले कडधान्य, गव्हाचा ब्रेड, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, ढोकळा तसेच उपमा, पोहे इत्यांदीचा सकाळच्या नाश्त्यात समावेश करावा.
सकाळचा नाश्ता केल्याने वजन जास्त वाढतं?
सकाळच्या पोटभर नाश्त्यात साधारणपणे 260 कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता जर पोटभर केला तर त्यानंतर आपण शरीराची हालचाल करणे किंवा आपली दिनचर्या फॉलो करणे गरजेचे आहे. जर ठप्प बसून राहाल, तर तुमच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं. सोबतच सकाळच्या नाश्त्यात आपण कोणता आहार घेतो, हे सुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत असते. त्यामुळे सकाळी नाश्त्यात योग्य पौष्टीक आहार घेणे, आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.