Does watching food reels lead to weight gain  
फूड

Food Reels: इंस्टाग्रामवर फूड रील्स पाहिल्याने वजन वाढत का? जाणून घेऊ

पण जेव्हा जेव्हा फोन हातात घेतो तेव्हा इंस्टावर रील्स स्क्रोल केल्याशिवाय आपल्या जिवाला शांती मिळत नाही.

सकाळ डिजिटल टीम

इंस्टाग्रामवर फूड रील्स पाहिल्याने वजन वाढत का? हे वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. कारण बदलत्या जीवनशैलीमुळ प्रत्येकाला वजन वाढीची समस्या भेडसावत आहे. अनेक उपाय करुनही वजन काही केल्या कमी होईना. अशातच हे विधान वाचल्यावर ऐकल्यावर थोडं विचित्र वाटलं असेल.

कारण, आपण जेव्हा जेव्हा फोन हातात घेतो तेव्हा इंस्टावर रील्स स्क्रोल केल्याशिवाय आपल्या जिवाला शांती मिळत नाही. या स्क्रोलिंगदरम्यान अनेक पदार्थांचे व्हिडीओ आपल्या समोर येत असतात आणि मग आपण त्या पेज वर जाऊन विविध पदार्थ पाहण्याचा आनंद घेतोच पण सोबत मनात अनेक स्वादिष्ट पदार्थांचे क्रेव्हिंग्स पण होत असतात याचा अनुभव तुम्हाला स्वतःला देखील आलाच असेल. तर आज आपण जाणून घेऊयात इंस्टाग्रामवर फूड रील्स पाहिल्याने वजन वाढत का?

कंटेंट क्रिएटर केविन झिंगखाई यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखीतमध्ये इंस्टाग्रामवर सुरु असलेल्या फुड्सच्या रील्सवर भाष्य केलं. इंस्टावर गेल्या काही दिवसांपासून विविध रेसिपीज, फुड ब्लॉग तयार करण्याची क्रेझ अधिक पाहायला मिळत आहे. आणि हे युजर्सनादेखील आवडत आहे.

अनेकजण परिपुर्ण नसले तरी फुड ब्लॉग बनवण्याचे धाडस करत आहेत. काही ना काही तरी स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची अनेकांची धडपड इंस्टावर पाहायला मिळत असल्याचे केविन झिंगखाई यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.

तसेच, प्रेक्षकांना शेवटी काहीतरी भारी पाहायला मिळेल अशी अपेक्षा असते प्रेक्षकांची कायमस्वरूपी लक्ष वेधून ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे. हायड्रॉलिक प्रेसद्वारे वस्तूंचे क्रशिंग असो किंवा कोणी समुद्रात उडी मारण्याची घटना असो, प्रेक्षकांना व्हिडीओचा शेवट कसा असणार हे पाहण्याची उत्सुकता असते.

अन्नाचे व्हिडिओ व्यसनाधीन असतात. ते आपल्याला स्वतःकडे आकर्षित करत असतात. जणू ही सोन्याची खाणंच आहे. शेवटी, स्वादिष्ट पदार्थ तयार होताना पाहणे कोणाला आवडणार नाही? आपण स्वतःला डाएटची आठवण करुन देत असलो तरी व्हिडीओ पाहणे थांबवत नाही.

त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतो तो म्हणजे फुड रिल्स पाहिल्यावर वजन वाढतं का? तर यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहू. दिल्ली येथील समुपदेशन मानसशास्त्रज्ञ शिवांगी राजपूत यांनी यावर भाष्य केलं आहे. फूड रील्स पाहणे आपल्या मनावर अनेक प्रकारे परिणाम करू शकते.

फूड रील्स तुम्हाला सकारात्मकतेची ऊर्जा तसेच तुमचा मूड सुधारण्यास मदत आणि विश्रांती देऊ शकते. पण याचा विपरित परिणामदेखील होऊ शकतो. अनेक फूड ब्लॉगर आपल्याला आकर्षित करतात आणि आपली पाऊलं आपोपच खाण्याकडे वळतात. पण रील्समध्ये पाहिलेलं खाद्यपदार्थ हे खिशाला परवडणारे नसतात त्यामुळे मनात स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण होते.

रील्स बहुतेक वेळा व्यसनाधीन पदार्थांप्रमाणेच मेंदूच्या आनंद केंद्रांना सक्रिय करतात. जेव्हा एखादी व्यक्ती भरपूर फूड रिल्स पाहते, तेव्हा त्याला त्या पदार्थांची जास्त इच्छा होऊ लागते. जो पदार्थ पाहिला आहे, तो पदार्थ शोधण्याची खाण्याची त्यांना तीव्र इच्छा निर्माण होते. यामुळे खाण्याच्या सवयींमध्ये बदल होतो.

विशेषतः रील्समध्ये दाखवण्यात आलेलं खाद्यपदार्थ हे अतिप्रमाणा कॅलरी असलेले असतात त्यामुळं त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

बेंगळुरु येथील मानसशास्त्रज्ञ सुमलता वासुदेव यांचही हेच मत आहे. एखादी विशिष्ट खाद्यपदार्थाची जाहिरात किंवा रील पाहिल्या तुमच्या मनात लालसा निर्माण होते ज्याचा परिणाम शरिरावर गंभीर असतो.

फुड रिल्स पाहिल्यावर वजन वाढतं का?

शिवांगी राजपूत यांच्या मते फुड रिल्स पाहिल्यावर वजन वाढतं.

भुरळ पाडणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सततच्या रिल्समुळं लालसा आणि भूक वाढू शकते, ज्यामुळे तुम्ही अधिक कॅलरीचयुक्त पदार्थ खाता.

फुड रीलमुळे मनामध्ये वेगळी भावना निर्माण होते. पोट भरलं असल तरी रिकाम असल्यासारखं वाटतं. त्यामुळं भुकेच्या संकेतांच्या पलीकडे खाण्याची शक्यता वाढते.

याचा परिणाम आपल्या शरिरावर होतो आणि आपलं वजन वाढतं.

तसेच, तुमची बोटे फक्त स्क्रोल करत राहतात, ज्यामुळे स्क्रीनचा वेळ वाढतो आणि शारीरिक हालचालींचा अभाव होतो. याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होतो.

विचित्र खाण्याच्या सवयी, झोपेची कमतरता आणि खूप कमी शारीरिक हालचाली हे वजन वाढण्याची मुख्य कारणे असतात.

तर यावर उपाय कोणता?

संतुलित खाणे आणि निरोगी अन्न निवडींना प्रोत्साहन देणाऱ्या पेजला फॉलो करा.

व्हिडीओमध्ये जे दिसत आहे त्याचे अनुकरण करण्यापेक्षा भुकेचे संकेत लक्षात घ्या.

वापरलेल्या कोणत्याही अतिरिक्त कॅलरींची भरपाई करण्यासाठी नियमित शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त रहा.

आत्म-सहानुभूतीचा सराव करा आणि लालसा उद्भवल्यास स्वतःवर खूप नियंत्रण ठेवा.

फूड रील्सचा तुमच्या लालसा आणि खाण्याच्या सवयींवर काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव असणे अत्यावश्यक आहे.

सोशल मीडियाचा तुमच्या खाण्याच्या सवयी किंवा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे तुम्हाला आढळल्यास त्यापासून ब्रेक घ्या.

हातात सतत फोन घेणं टाळा.

वैयक्तिकरित्या मित्र आणि कुटूंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि सोशल मीडियाद्वारे संवाद टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT