सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजी esakal
फूड

Diwali Festival 2021: सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजी, वाचा रेसिपी

सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजीची सोपी रेसिपी

सकाऴ वृत्तसेवा

सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजीची सोपी रेसिपी

आपल्या भारतामध्ये सर्व सणसमारंभ उत्साहात साजरे केले जातात. त्यात दिवाळी सण हा सर्वांचा आवडीचा सण. दसरा सण संपला की, दिवाळीची तयारी सुरु होते. दिवाळी सण काही दिवसांवर आल्यावर प्रत्येक घरात फराळ बनवण्यासाठी घाई सुरु असते. यावेळी फराळामध्ये करंजी, बेसन लाडू, रवा लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, शेव, अनारसे, असे अनेक पदार्थ बनवले जातात. पण दिवाळीला सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे 'करंजी'. मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून करंजी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजीची सोपी रेसिपी.

साहित्य:

- मैदा अर्धा किलो

- मीठ अर्धा चमचा

- तुपाचे किंवा रिफाईंड तेलाचे मोहन आठ चमचे

- सुक्या खोबऱ्याचा कीस तीन वाट्या

- पिठीसाखर दोन वाट्या

- खसखस तीन-चार चमचे

- कणीक पाव वाटी

- वेलची पूड एक चमचा

- तळण्यासाठी तूप वा रिफाईंड तेल

कृती: सुरवातीला खोबऱ्याचा किस तयार करुन घ्या. तो किस सर्व बाजूने हलवत गुलाबी रंगावर भाजून घ्या. त्यानंतर गार झाल्यावर हाताने कुसकरून अथवा मिक्सरवर थोडासा बारीक करून घ्या. नंतर खसखस भाजून पूड करा. तसेच कणीक तांबूस भाजून घ्या. नंतर खोबऱ्याचा कीस, खसखस पूड, भाजलेली कणीक, पिठीसाखर आणि वेलची पूड एकत्र करून सारण तयार करा.

मीठ व तुपाचे मोहन घालून मैदा घट्ट भिजवा. नंतर त्याच्या लहान-लहान पुऱ्या लाटून त्यात सारण भरा. त्याला करंजीच्या आकारात दुमडून त्याचे (कड कापून) तुपात वा तेलात तळून कागदावर पसरून ठेवा. करंजी गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. अशा पद्धतीने सुक्या खोबऱ्याच्या खुशखुशीत करंज्या तयार झाल्या आहेत.

(संदर्भ: पुस्तक- मराठी सण...मराठी रेसिपी, सकाळ प्रकाशन, लेखिका-अश्विनी अजित डिके)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT