Dry bombil chutney Esakal
फूड

Dry bombil chutney: सुख्या बोंबलाची चटणी कशी तयार करायची?

बोंबील च्या सेवनामुळे डोळ्या संबंधीचे काही विकार असतील तर ते नष्ट होत असतात.

सकाळ डिजिटल टीम

बोंबील बाजारांमध्ये अगदी सहजपणे मिळत असतात. बोंबील हे खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. जगभरामध्ये जवळपास दोन हजार आठशे जातींचे झिंगे बोंबील असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असले तरी खाण्यामध्ये याचा अंदाज काही निराळाच असतो खाण्यासाठी हे खूपच स्वादिष्ट लागत असतात.

बोंबील मध्ये आयरन चे प्रमाण चांगले असते ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मिळत असते. यामुळे शरीरामध्ये असलेल्या मांसपेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळे याच्या सेवनामुळे मेंदू देखील तल्लख होत असतो. यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते हे आपल्या मेंदूसाठी खूपच उपयुक्त मानले जाते.

बोंबील च्या सेवनामुळे डोळ्या संबंधीचे काही विकार असतील तर ते नष्ट होत असतात. अनेकदा कंप्यूटर मोबाईल समोर तासन्तास काम केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर डोळे खूपच थकून जात असतात. अशावेळी बोंबील चे सेवन केल्यास डोळ्याचा आलेला थकवा नश्ट होत असतो. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्या साठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात.

आजच्या लेखात आपण सुख्या बोंबलाची चटणी कशी तयार करायची याची खास रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

सुखे बोंबील

हळद

चवीनुसार मीठ

दोन चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला

एक इंच आले

मुठभर कोथिंबीर

तिन ते चार हिरव्या मिरच्या

आठ ते नऊ लसुन पाकळ्या

तेल

कृती 

सर्व प्रथम आले लसुन,मिरची आणि कोथिंबीर ची पेस्ट करून घ्यावी. सुखे बोंबील एक एक करून विस्तवावर खरपूस भाजून घ्यावे. सुखे बोंबील भाजून झाल्यावर एका कोमट पाण्यात सर्व बोंबील 5 मिनिटे भिजवून बाहेर काढावेत. आता हे बोंबील मिक्सरला जाडसर फिरवून घ्यावे एकदम आपल्याला पावडर नाही बनवायची.

जर आपल्या जवळ पाटा असेल तर त्यावर ठेचून ठेचून बारीक करू शकता. आता हा बोंबलाचा चुरा एका भांड्यात काढून घ्यावा. आता यात एक छोटा चमचा हळद टाकावी. 2 चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. दीड चमचे आपण तयार केलेली हिरवी पेस्ट टाकायची आणि आपल्या चवी नुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.

आता एका कढईत 2 मोठे चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्यावे. तेल चांगले तापल्यावर सुख्या बोंबलाचे सर्व मिश्रण यात टाकावे. हे सर्व मिश्रण तेलात सारखे परतत राहायचे. ग्यास मंद आचेवर ठेवून किमान 15 मिनिटे सतत परतवून चटणी अतिशय कुरकुरीत करायची. नंतर एका छान वाटीत हि चटणी काढून घ्यावी. तयार आहे सुख्या बोंबलाची कुरकुरीत, झणझणीत आणि चटपटीत चटणी. हि चटणी आपण काचेच्या बरणीत भरून साधारण 5 दिवस गरमागरम भाकरी सोबत खावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT