Bhagwat Ekadashi Special Upvas Recipe: आज सर्वत्र भागवत एकादशीचा उपवास आहे, एकादशीच्या व्रतामुळे खूप फायदे होतात, असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी शक्यतोवर फलाहार किंवा फळांनी तयार केलेलेच पदार्थ खावे. शिवाय साबूदाणा खिचडी आणि भगर तर आता जुने झाले त्यापेक्षा तुम्ही असे कच्च्या केळीचे कबाब (raw banana kabab) करू शकतात. अगदीच २० मिनिटात हे तयार होतील आणि चवीलाही खूप चविष्ट लागतील.
साहित्य :
कच्ची केळी
हिरवी मिरची
सैंधव मीठ
तेल अथवा तूप
हळद
शिंगाड्याचे पीठ
कृती :
सर्वप्रथम, कच्च्या केळीला हाताला तेल लावून चांगले सोलून घ्या. साल काढल्यानंतर केळीचे ३-४ काप करून घ्या.
एका भांड्यात पाणी उकळवत ठेवा त्यात कच्च्या केळ्याचे काप टाका. शिजल्यानंतर केळी बाहेर काढा.
त्यात हिरव्या मिरच्या, एक वाटी शिंगाड्याचं पीठ, मीठ, हळद टाका आणि हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
हे मिश्रण मळलेल्या पीठासारखे दिसू लागले, की त्यावर झाकण ठेऊन थोडावेळ बाजूला ठेवून द्या.
कढईत तेल अथवा तूप टाकून गरम करायला ठेवा. एकीकडे पीठाचे चांगले गोलाकार देऊन छोटे टिक्की तयार करा.
तेल गरम झाल्यानंतर त्यात हे टिक्की चांगले सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे कच्च्या केळ्याचे कबाब रेडी झाले आहेत.
हे कबाब खाल्ल्याने फक्त भूक भागणार नसून, यातून मिळणारे पौष्टीक तत्वे एनर्जी लेव्हलही वाढवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.