Father’s Day 2024 esakal
फूड

Father’s Day 2024 : वडिलांसोबतच्या नात्यात गोडवा वाढवायचाय? मग, फादर्स डे निमित्त बनवा ‘हे’ खास पदार्थ

Father’s Day 2024 : आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता, प्रेम, आदर आणि त्यांचे आयुष्यातील महत्व दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Father’s Day 2024 : आपल्या जीवनात वडिलांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. मुलांचे आयुष्य घडवण्यात वडिलांची सर्वात मोठी भूमिका असते. आई-सोबत वडिल देखील आपल्या मुलांसाठी तितकेच झटत असतात. वरून जरी कडक शिस्तीचे आणि प्रसंगी रागावणारे वडिल आतून आपल्या मुलांना तितकाच जीव लावत असतात. आपले जीवन सुसह्य आणि आनंदी व्हावे यासाठी वडिल सर्वोतोपरी प्रयत्न करतात. त्यामुळे, वडिल हेच आपले खरे सुपरहिरो आहेत.

जगभरात दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज फादर्स डे निमित्त तुम्ही देखील तुमच्या वडिलांसाठी घरच्या घरी काही गोड पदार्थ नक्कीच बनवू शकता आणि त्यांना प्रेमाने खाऊ घालू शकता. कोणते आहेत ते गोड पदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

मॅंगो पुडिंग

जर तुमच्या वडिलांना आंबे खायला आवडत असतील तर तुम्ही खास आंब्यांपासून हा गोड पदार्थ बनवू शकता. सध्या आंब्याचा सिझन देखील सुरू आहे. त्यामुळे, तुम्हाला मार्केटमध्ये उत्तम प्रतीचे आणि चवदार असे आंबे मिळतील. मॅंगो पुडिंग ही डिश तुम्ही कमी साहित्यामध्ये बनवू शकता.

हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला ४ गोष्टींची गरज भासणार आहे. सर्वात आधी क्रंची बिस्किटांचा एक थर तयार करा. त्यानंतर, त्यावर ताज्या आंब्याचे तुकडे आणि गोड अशा आंब्याची प्युरी घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यावर आणखी क्रश केलेल्या बिस्किटांचे तुकडे टाकू शकता.

चॉकलेट डच ट्रफल केक

चॉकलेट केक हा हमखास सगळ्यांनाच आवडतो. कोणत्याही प्रसंगाचे किंवा एखाद्या गोष्टीचे सेलिब्रेशन करण्यासाठी चॉकलेट केक आणला जातो किंवा बनवला जातो. हा केक कापून आनंद साजरा केला जातो. फादर्स डे निमित्त तुम्ही देखील हा चॉकलेट केक सोप्या पद्धतीने बनवू शकता. हा केक बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज पडत नाही. तुम्ही केवळ ३०-४० मिनिटांमध्ये हा केक बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT