शनिवार -रविवार आल्यावर लोकांना मस्त चमचमीत काहीतरी खायचं असतं. सोमवार ते शुक्रवार या काळात जे पदार्थ करणे जमत नाही ते पदार्थ या काळात करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यात मासे (Fish) तर अनेकांना प्रिय असतात. बाहेरून रेडिमड फिश करी किंवा फिश फ्राय मागवले जाते. पण दरवेळी तसं करणं शक्य होईलच असं नाही. दूर राहणारे अनेकजण आपल्या आई-आजीला विचारून ताजे मासे आणून पदार्थ (Food) करण्याचा प्रयत्न करतात. पण ते तसे सोपे नाही. कारण मासे साफ करणे, त्याची लहान हाडे काढणे, मॅरीनेट करणे हे सगळं करण्याबरोबर मासा उत्तम शिजावा यातहील कौशल्य आहे. पण वेळकाढूपणा न करता तुम्ही पटापट आणि सोप्या पद्धतीने उत्तम फिश शिजवून तुम्ही विकेंड मस्त एन्जॉय करू शकता.
माशांची खरेदी योग्य करा- मासे खरेदी करताना, त्याचा सुगंध कसा आहे ते बघा. जर सुगंध सौम्य असेल तर मासा चांगला आहे. तज्ज्ञांच्या मते, मासे विकत घेताना त्याचे डोळे स्फटिकासारखे स्वच्छ असले पाहिजेत. तसेच गिलांचा रंग लालसर गुलाबी असावा.
लहान हाडे (pin bones) काढण्यास सांगा- फिलेटच्या सर्वात जाड भागासह आढळणारी हाडे ही लहान हाडे असतात. ती अशीच हातांनी काढता येत नाहीत. म्हणून जिथून मासे घेणार आहात त्यांना ही हाडे काढण्यास सांगा. पण सांगताना चिमटा धारदार पक्कडीच्या मदतीने काढण्यास सांगा. म्हणजे तो मासा पूर्ण स्वच्छ होईल.
योग्य प्रकारे स्टोअर करा- मासे लवकर खराब होतात. म्हणून मासे स्वच्छ केल्यानंतर झिपलॉक बॅगेत ठेवा. आणि ती पिशवी बर्फाच्या वरच्या भागात ठेवा. असे केल्याने मासे बराच काळ थंड आणि ताजे राहतील. तसेच ते खराब होणार नाहीत.
खूप वेळ मॅरिनेट करून ठेवू नका- मासे मऊ असतात. ते जास्त वेळ मीठ किंवा आम्लयुक्त पदार्थात मॅरीनेट करून ठेवल्यास शेवटी पदार्थ खराब होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, स्वॉर्डफिश सारख्या स्ट्रीकी माशांना जास्तीत जास्त 2 तास मॅरीनेट केले जाऊ शकते. तर काही मासे हे 30 मिनिटांपेक्षा जास्त मॅरीनेट करू नयेत.
मासे मॅयोनीज लावून ग्रीस करणे चांगले- तज्ज्ञांच्या मते, माशांना ग्रिलवर ठेवण्यापूर्वी मेयोनीज लावून ठेवणे चांगले असते. मेयोनिजने मासे ग्रिस केल्याने किंवा मेयोनीज माश्यांना लावल्याने ग्रीलपॅनवर मासे चिकटत नाही. आणि खरपूर भाजले जातात. त्यामुळे पदार्थाची चवही उत्कृष्ट लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.