Raw Mango Pickle making tips Esakal
फूड

Raw Mango Pickle: साठी कोणती कैरी वापरावी, या कैरीचं लोणचं बनेल चटकदार

famous variety of mango for pickle: उन्हाळ्यामध्ये बाजारात विविध प्रकारच्या कैऱ्या उपलब्ध असतात. मात्र यासाठी लोणच्यासाठी कोणती कैरी निवडावी असा प्रश्न तुम्हाला पडला असले तर आम्ही तुम्हाला लोणच्यासाठी योग्य कैरी निवडण्याच्या काही टिप्स देणार आहेत

Kirti Wadkar

लोणचं हा शब्ध एकताच जिभेला पाणी सुटतं. जेवणातही Meal कितीही भाज्या असल्या किंवा छानशी आमटी किंवा वरण असलं तरी जेवणाची खरी चव वाढते ती म्हणजे एका छोट्याश्या लोणच्याच्या फोडीने. Marathi Reciepe how to make Raw Mango Pickle

भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये, एवढचं काय तर वेगवेगळ्या गावांमध्ये आणि प्रत्येक घरात लोणचं Pickles तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. शिवाय लोणचं हे अनेक पदार्थांचं बनवलं जातं. यात मिरची, गाजर, करवंद, लिंबू आणि कैरीचं लोणचं सगळेच आवडीने खातात.

सगळ्या लोणच्यांमध्ये मात्र खास महत्व आहे ते म्हणजे फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या म्हणजेच कैरीच्या Raw Mango लोणच्याला. लग्नाची पंगत असो किंवा हॉटेलमधल्या जेवणाचा बेत आपलं बोट कैरीच्या लोणच्याकडे गेल्यावाचून राहत नाही.

कैरीचं लोणचही वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. यात खास करून कैरीचं आंबट तिखट लोणचं अनेक घराघरांमध्ये बनतं. याशिवाय कैरीचा मुरंबा किंवा आंबट गोड कैरी असे प्रकार पाहायला मिळतात.

उन्हाळ्यामध्ये बाजारात विविध प्रकारच्या कैऱ्या उपलब्ध असतात. मात्र यासाठी लोणच्यासाठी कोणती कैरी निवडावी असा प्रश्न तुम्हाला पडला असले तर आम्ही तुम्हाला लोणच्यासाठी योग्य कैरी निवडण्याच्या काही टिप्स देणार आहेत.

हे देखिल वाचा-

लोणच्याचे आंबे किंवा कैऱ्या या इतर खाण्यासाठी असलेल्या कैरीहून काहीश्या वेगळ्या व्हरायटीच्या असतात.

जाड सालीच्या कैऱ्या- लोणच्यासाठी कैऱ्या विकत घेताना त्या जाड सालीच्या आहेत हे पडताळून पाहवं. जाड सालीच्या कैऱ्या आंबट असतात. शिवा या कैऱ्यांपासून तयार करण्यात आलेलं लोणचं जास्त काळ टिकतं. तसचं कैरी टणक असेल हे पाहून घ्यावं

लोणच्यासाठी कोणच्या जातीची कैरी वापरावी- लोणचं तयार करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये कैरीच्या वेगवेगळ्या जातींचा वापर केला जातो.

महाराष्ट्रामध्ये साधारण राजापुरी कैरी, लाडवा कैरी तुम्ही लोणच्यासाठी निवडू शकता. याचप्रमाणे तुमच्या भागात मिळणारी कोणतीही गावरान कैरी देखील तुम्ही लोणच्यासाठी वापरू शकता. फक्त कैरी पूर्णपणे परिपक्व, कडक आणि आंबट असणं गरजेचं आहे.

लोणचाच्या कैरीचा आकार- लोणच्याच्या कैरीचा आकार हा साधारण गोलाकार असतो. बाजारामध्ये लोणच्यासाठी मिळणाऱ्या कैऱ्या या गोलाकार आणि काहीश्या साधारण आंब्याहून काहीशा मोठ्या असतात. त्यांचा रंग गडद हिरवा असतो. तसचं त्यांची सालही मुलायम नसते.

वासावरून ओळखा – लोणच्याच्या आंबट कैऱ्या आणि गोड खाण्याचे आंबे याच्या सुगंधामध्ये बराच फरक जाणवतो. यासाठी कैरी खरेदी करताना त्यांचा वास घ्या. पिकलेल्या कैरीचा सुंगध हा आंबट कच्च्या कैरीहून वेगळा असतो. शक्य झाल्यास तुम्ही कैरीची चव घेऊन ती आंबट आहे हे पडताळूनही कैरी विकत घेऊ शकतात.

अशा प्रकारे लोणचं तयार करण्यासाठी तुम्ही कैऱी निवडू शकता. वर्षभर टिकणाऱ्या लोणच्यासोबतच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फक्त काही दिवस किंवा साधारण २-३ महिने फ्रिजमध्ये साठवता येईल असं झटपट लोणचं देखील तयार केलं जातं.

या लोणच्यासाठी तुम्ही इतर कोणत्याही कैऱ्या वापरू शकता. यासाठी तुम्ही पातळ सालीच्या कैऱ्या निवडल्यास असं इंस्टंट लोणचं लवकर मुरण्यास मदत होते.

झटपट लोणच्यासाठी लहान आकाराच्या किंवा मध्यम कैऱ्याही निवडू शकता. तसचं हापूस, तोतापुरी किंवा केसर आणि मद्रास आंब्याच्या कैरीचं झटपट लोणचं ही चविष्ट बनतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT