तुम्ही कधी विचार केला आहे का? लहानांपासून मोठ्यांना आवडणारी 'फ्रेंच फ्राईज' कुठे आणि कोणी बनवली? त्याचा इतिहास काय आहे आणि भारतात लोकांना ते का आवडते? जर तुम्हाला याबद्दल काही माहित नसेल तर तुम्ही हा लेख जरूर वाचा. कारण, या लेखात आम्ही तुम्हाला फ्रेंच फ्राईजच्या काही मनोरंजक इतिहासाबद्दल सांगणार आहोत, तर जाणून घेऊया.
फ्रेंच फ्राईजच्या इतिहासाबद्दल...
फ्रेंच फ्राईजचा इतिहास खूप मनोरंजक आहे. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, फ्रान्स आणि उत्तर बेल्जियमच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना बटाटे तळून खाणे खूप आवडायचे. त्याचबरोबर ते मासे देखील तळून खात असत. पण, हिवाळ्याच्या ऋुतूमध्ये, जेव्हा नद्यांचे रुपांतरण बर्फात व्हायचे, तेव्हा त्यांनी मासे वगळता दुसरे खाणे पसंत केले. त्याच वेळी, तिथल्या नागरिकांनी बटाटे छोट्या माशांच्या आकारात कापून ते तेलात तळून खायला सुरूवात केली. तेव्हापासून, प्रत्येक हिवाळ्यात, तेथील नागरिक तळलेले बटाटे प्रामुख्याने आपल्या आहारात समाविष्ट करीत असे. या परंपरेनंतर, फ्रेंच फ्राईज जवळजवळ संपूर्ण फ्रान्समध्ये आवडू लागले.
17 व्या शतकामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ सुरू होता. या काळात सैनिकांना फक्त फ्रेंच फ्राईज खायला दिले गेले, त्यानंतर ते आणखी आवडीने खाऊ लागले. बर्याच लोकांचा असाही विश्वास आहे की, त्यांनी या फ्राईड बटाट्याचे नाव 'फ्राइट्स पोंट न्यूफ' हे फ्रान्समधील प्रसिद्ध पॅरिसियन पुलावरून ठेवले होते, जे नंतर फ्रेंच फ्राईज म्हणून ओळखले जाऊ लागले.
अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, ही डिश प्रथम थॉमस जेफरसन नावाच्या व्यक्तीने बनविली होती. यानंतर, हे हळूहळू संपूर्ण युरोपमध्ये आणि नंतर आशियाई देश, आफ्रिकन देश आणि आखाती देशांमध्ये लोकप्रिय झाले. तुमच्या माहितीसाठी, युरोपमध्ये ही डिश इतर अनेक नावांनीही ओळखले जाते. उदा. स्कीनी फ्रेंच फ्राईज, राउंड फ्रेंच फ्राईज, क्लासिक फ्रेंच फ्राईज आदी..
हा लेख वाचल्यानंतर आता नक्कीच असे म्हटले जाऊ शकते की, फ्रेंच फ्राईजच्या या मनोरंजक इतिहासाबद्दल जाणून घेणे तुम्हाला आवडले असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर फेसबुकवर शेअर करा आणि असे आणखी लेख वाचण्यासाठी ईसकाळ वेबसाइटशी कनेक्ट राहा..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.