फ्रेंच फ्राईजची टेस्ट लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच आवडणारी आहे. मूव्हीला जायचं असेल किंवा कॅफेमध्ये जायचं असेल तरी अनेकजण फ्रेंच फ्राईज आवडीने विकत घेतात. मात्र फ्रेंच फ्राईजची मार्केटमधली किंमत बघितलीत तर ती सर्वसामान्यांना रोज परवडणारी नाही. तेव्हा तुम्ही जर का घरच्या घरी फ्रेंच फ्राईज बनवण्याची रेसिपी जाणून घेतली तर तुमचे बरेच पैसे वाचू शकतात. जाणून घ्या सोपी रेसिपी आणि चटपटीत चव.
फ्रेंच फ्राईज सामग्री
२५० ग्राम आलू
चवीनुसार मीठ
चवीनुसार चाट मसाला
तळण्यासाठी पुरेसं तेल
फ्रेंच फ्राईज रेसिपी
आलूचे छिलके काढत फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये आलूचे काप करून घ्या. आणि त्यावर पाणी सोडत राहा. त्यामुळे आलू काळे पडणार नाहीत. त्यानंतर पाच मिनीट आलूचे काप पाण्यात राहू द्या.
आता एका पातेल्यात पाणी टाकून गॅसवर चढवा. पाणी उकळायला आलं की त्यात मीठ आणि आलूचे काप सोडा. चांगली उकळ आल्यावर ५ मिनीट त्याला झाकून ठेवा.
नतंर आलूचे काप पाण्यातून काढत त्याला कपड्याने हलक्याने पुसून घ्या वाळत घाला.
आता एका कढईत तेल गरम करा आणि आलूचे काप तेलात सोडत त्याला सोनेरी होतपर्यंत तळा आणि नंतर पेपरवर काढून घ्या. त्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.
आणि तयार झालेत तुमचे फ्रेंच फ्राईज. प्लेटमध्ये घ्या आणि रेस्टॉरेंटसारख्या फ्रेंच फ्राईजचा आनंद घरबसल्या कमी पैशांत घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.