Ganesh Chaturthi 2023 Recipes : अवघ्या दोन दिवसांवर लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. घराघरांत- मंडळांमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन करण्यासाठी भक्तगण आतूर झाले आहेत. आता पुढील १० दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात भाविक मग्न असणार आहेत.
तर दुसरीकडे लाडक्या बाप्पाच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता होऊ नये, यासाठी आरतीपासून ते बाप्पाच्या नैवेद्यापासून सर्व गोष्टींची भाविकांकडून पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. नैवेद्यावरून आठवले की आज आपण या लेखाच्या माध्यमातून रव्या-खोबऱ्याच्या मोदकाची सोपी व स्वादिष्ट रेसिपी पाहणार आहोत.
रवा - दोन कप
तूप - अर्धा कप
किसलेले ओले खोबरे - दोन कप
फ्रेश क्रिम - एक कप
केशरयुक्त दूध - ¼ कप
पिठीसाखर - एक कप
वेलची पावडर - चवीनुसार
सुकामेव्याचे काप - आवश्यकतेनुसार
एक कढईमध्ये तूप वितळवून घ्या.
तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये रवा परतून घ्यावा.
१५ ते २० मिनिटांसाठी रवा परतून घ्यावा.
यानंतर रव्यामध्ये किसलेले ओले खोबरे देखील मिक्स करा व व्यवस्थित परतून घ्या.
यानंतर मिश्रणात फ्रेश क्रिम देखील मिक्स करावी.
मिश्रण नीट एकजीव होण्यासाठी यामध्ये केशरयुक्त दूध मिक्स करा.
आता पिठीसाखर आणि वेलची पावडर मिक्स करावी.
आता मिश्रणात सुकामेव्याचे काप मिक्स करा व गॅस बंद करून कढईवर १५ मिनिटांसाठी झाकण ठेवावे.
मोदक तयार करण्यासाठी तुमच्याकडे मोदकाचा साचा असणे आवश्यक आहे.
मोदकाचा साचा घ्यावा त्यावर आधी सुकामेवा ठेवून नंतर मोदकाचे सारण ठेवावे.
आता साचा घट्ट बंद करून साच्याच्या खालील बाजूने हलक्या हाताने दाब द्यावा.
आता मोदकाचा साचा उघडा. तयार आहे रव्या-खोबऱ्याचा स्वादिष्ट मोदक.
तर मग यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी रव्या-खोबऱ्याचे मोदक घरच्या घरी नक्की करा.
Content Credit Instagram @home_cookinglove_
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.