modak sakal
फूड

Ganesh Chaturthi 2023: मुगाच्या डाळीचे झटपट आणि चविष्ट मोदक, पाहा सोपी रेसिपी

गणेश चतुर्थीला स्पेशल बनवण्यासाठी आणि गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही घरी मूग डाळीचे मोदक बनवू शकता.

Aishwarya Musale

Ganesh Chaturthi Special Bhog Recipe: गणेश चतुर्थीचा सण चतुर्थीपासून सुरू होतो आणि दहा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाने संपतो. दहा दिवसांत गणपतीला 10 वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. गणेश चतुर्थीचा सण मोदकाशिवाय अपूर्ण मानला जातो.

गणेश चतुर्थीला स्पेशल बनवण्यासाठी आणि गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही घरी सहज मूग डाळीचे मोदक बनवू शकता. ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

मूग डाळ मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • २ कप मूग डाळ

  • ३ कप तांदळाचे पीठ

  • 50 ग्रॅम गूळ

  • एक टीस्पून वेलची पावडर

  • 2 चमचे पिठी साखर

  • एक कप दूध

  • एक चिमूटभर मीठ

  • आवश्यकतेनुसार पाणी

मोदक बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • गॅसवर एका कढईत एक कप पाणी गरम करून त्यात गूळ मिसळा आणि ढवळत असताना मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा.

  • गुळाचे पाक घट्ट होऊ लागल्यावर त्यात अर्धा कप दूध आणि वेलची पूड मिसळा आणि साधारण ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.

  • आता या मिश्रणात मूग डाळ आणि एक कप पाणी घालून पॅन झाकून ठेवा. नंतर गॅस कमी करा आणि डाळ शिजू द्या. नंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.

  • दुसऱ्या भांड्यात तांदळाच्या पिठात साखर आणि मीठ मिसळा. अर्धा कप दूध गरम पाण्यात मिसळा आणि त्याच्या मदतीने तांदळाचे पीठ मऊ मळून घ्या.

  • आता थोडं पीठ घेऊन गोलाकार करून चपटा करून त्यात गूळ-मुगाच्या डाळीचं मिश्रण टाकून ते पिठात बंद करून मोदकाचा आकार द्या. त्याचप्रमाणे सर्व साहित्यापासून मोदक तयार करा.

  • तयार केलेले मोदक स्टीलच्या भांड्यात ठेवा, नंतर कुकरमध्ये पाणी घाला आणि त्यात मोदक असलेले भांडे ठेवून कुकर झाकून टाका. साधारण 15 मिनिटे मोदक वाफेवर ठेवा. यानंतर ते बाहेर काढून थंड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT