Garlic Pickle Recipe  
फूड

Garlic Pickle Recipe: आरोग्यासाठी फायद्याचं आहे लसणाचं लोणचं; जाणून घ्या रेसिपी

लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदा होतो. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

लसणाचा उग्र वास आणि त्याची चव अनेकांना आवडत नाही. त्यामुळे अनेकजण लसूण खाण्यास टाळतात. पण तुम्हाला माहितीय का आरोग्यासाठी दररोज लसूण खाणे चांगले असते. लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदा होतो. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं.

त्यामुळं दररोज तुम्ही लसणाची एक तरी पाकळी तोंडात टाका. पण हे जरी नाही जमलं तरी. त्याचं लोणचं जेवताना तोंडी लावा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे लोणचं बनवायचं कसं? तर आम्ही तुम्हाला लसणाच्या फायद्यासह लसणाचं चटपटीत लोणच्याची रेसिपी देखील सांगणार आहोत.

तर काय आहेत लसणाचे फायदे

डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि इतरही काही समस्या कमी करण्यासाठी लसूण खाणे उपयुक्त असते. कफ कमी होण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसूण खाणे उपयुक्त असते.

लसूण मेंटल हेल्थसाठी देखील उपयुक्त आहे. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आपलं मन संतुलित राहते.

लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्यास कॅन्सरचा धोका कमी होतो.

आता लसणाचं लोणचं कसं बनवायचं?

साहित्य

अर्धा ते पाव किलो सोललेला लसूण

मोहरीचं तेल - अर्धी वाटी

मेथ्या - २ चमचे

मोहरी

चवीनुसार बडीशेप

लाल मिरची

कडीपत्ता

चवीनुसार मीठ

हळद

तिखट

व्हिनेगर(लोणचं टिकण्यासाठी)

कृती

कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. कडलेल्या तेलामध्ये मोहरी, मेथ्या, बडीशोप, कडीपत्ता, लाल मिरच्या घाला. त्यानंतर सगळे चांगले परतून मग लसूण पाकळ्या घाला. मग त्यावर मीठ, हळद आणि लाल तिखट घाला. सगळ्यात शेवटी व्हिनेगर घालून सगळे चांगले एकजीव करा. अशाप्रकारे तयार झाली तुमची लसणाची चटणी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT