शरीर निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टर फळे खाण्याचा सल्ला देतात. आंब्यापासून पेरूपर्यंत प्रत्येक फळाची चव अप्रतिम असते. सॅलड व्यतिरिक्त फळांपासून चटणीही बनवली जाते. भारतात कैरीपासून ते टरबूजपर्यंतच्या चटण्या बनवल्या जातात. आजकाल पेरू बाजारात मिळत आहेत. कच्च्या पेरूसोबत काळे मीठ, हे कॉम्बिनेशन खूप चवदार असते.
पेरूची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का? कदाचित तुम्हीही हे नाव पहिल्यांदाच ऐकत असाल? पेरूची चटणी एक नव्हे तर दोन प्रकारे करता येते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी झटपट चटणी बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.
पेरूची गोड आणि आंबट चटणी कशी बनवायची
गोड आणि आंबट चटणी खायला आवडणाऱ्या लोकांपैकी तुम्हीही आहात का? अशा परिस्थितीत यावेळी गोड आणि आंबट पेरू चटणीची रेसिपी करून पहा. पेरूची चटणी बनवायला जास्त वेळ लागणार नाही.
पेरूची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
२-३ मोठे पेरू
५-७ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
१ टीस्पून लिंबाचा रस
१/४ कप पुदिन्याची पाने
१/२ टीस्पून आले
१/२ टीस्पून जिरे
१/२ टीस्पून साखर
चटणी बनवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा-
सर्वप्रथम पेरू धुवून स्वच्छ करा.
आता पेरूचे छोटे तुकडे करा.
पुदिन्याची पाने खुडून घ्या आणि पाण्याच्या मोठ्या भांड्यात भिजवून ठेवा.
आले बारीक चिरून घ्या.
आता सर्वकाही मिक्सरमध्ये टाका आणि चांगले बारीक करा.
एकजीव झाल्यावर चटणीमध्ये ३ चमचे पाणी घालून पुन्हा बारीक करा.
आता चटणी एअर टाईट बरणीत ठेवा.
तुमची गोड आणि आंबट पेरूची चटणी तयार आहे.
मसालेदार पेरूची चटणी कशी बनवायची?
तुम्हाला मसालेदार अन्न आवडते का? विशेषतः चटणी. मसालेदार चटणी चवीसोबतच मूड फ्रेश होण्यास मदत करते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जर तुम्हाला फळांची चटणी आवडत असेल तर यावेळी मसालेदार पेरूची चटणी बनवा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खायला द्या.
मसालेदार पेरू चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
२-३ मोठे पेरू
एक लसूणचा पाकळी
१०-१२ हिरव्या मिरच्या
१ लहान आले
चवीनुसार मीठ
मसालेदार पेरूची चटणी बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-
मसालेदार पेरूची चटणी बनवण्यासाठी लसूण, हिरवी मिरची आणि थोडे आले ठेचून घ्या.
या गोष्टी खूप बारीक करू नका.
आता पेरूचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
आता पेरूच्या पेस्टमध्ये हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा.
तुमची मसालेदार पेरूची चटणी तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.