फूड

आजचा रंग निळा : स्मरणशक्ती वाढवायचीय ब्ल्यूबेरी खा!

कोणत्याही फॉर्ममध्ये ब्लूबेरी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं

सकाळ डिजिटल टीम

संजीव वेलणकर

नवरात्रीचा आजचा सातवा दिवस. रंग निळा. निळा रंग ब्ल्यूबेरीचा. आवळा, जांभूळ, स्ट्रॉबेरी, तुती, करवंद या बरोबरच ‘ब्ल्यूबेरी’ हे बेरीवर्गीय फळा मध्ये येते. भारतात हे फळ जास्ती वापरले जात नाही. ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ आहे. ब्लूबेरी अनेक शारीरिक समस्यांवर फायदेशीर आहे. ब्लूबेरीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे रिसर्चमध्ये ब्लूबेरीला 'सुपर फ्रूट' असं नाव देण्यात आलं आहे. कोणत्याही फॉर्ममध्ये ब्लूबेरी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. फ्रोजन फॉर्म, फ्रेश किंवा हर्बल टी फॉर्म मध्ये देखील ब्लूबेरी खाऊ शकतो.

ब्ल्यूबेरीची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन नावाच्या माणसाने याच्या बिया अमेरिकेत आणून त्याची लागवड केली. हे फळ स्कॉटलंडमध्ये 'ब्लेबेरी', नॉर्वेत 'ब्लॅबर' ओळखले जाते. विविध जाम आणि केक्समध्ये हे फळ वापरतात. निळ्या रंगांचं हे फळ चवीला मधूर असते. ब्ल्यूबेरीची पानं हिरवीगार तर फुलं घंटेच्या आकाराची असतात. त्यांचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो. फळाचा रंग अर्थातच निळा असतो मात्र कच्च्या फळाचा गर हा हिरवट रंगाचा असतो. असं हे फळ दिसायला अगदी बोरासारखं असून त्यात एक लहान बी देखील असते. जेली, जॅम, मफिन्स आणि स्नॅक्समध्ये वापरतात. पाश्चिमात्य देशांमध्ये पोषक ब्ल्यूबेरी फळाला चांगली मागणी आहे. हे फळ जास्त काळ टिकते.

असे आहेत उपयोग

मेंदूच्या विकारांवर मात करून स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं.

दररोज अर्धा कप ब्ल्यूबेरीचं सेवन केल्याने कर्करोगापासून संरक्षण करतं.

त्वचेचा पोत सुधारते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं.

मूत्राशयाचं आरोग्य सुधारून लघवी साफ होते.

उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करते.

यात जीवनसत्त्व ए, सी आणि ईचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते.

डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.

शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करते.

ब्यूर्बेरी ने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं.

मेंदूचे कार्य उत्तम गतीने चालण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी ब्लूबेरीचा रस आरोग्यदायक ठरतो, असे संशोधन नुकतेच समोर आले आहे.

त्वचा रुक्ष होण्यापासून टाळण्यासाठी ब्ल्यूबेरी खाणं उपयुक्त ठरतं.

रोझमेरी ब्लूबेरी स्मॅश.

साहित्य. ७-८ ब्ल्यूबेरी, रोझमेरीचे तुरे, २ चमचे मध, २ चमचे लिंबूरस, १ कप सोडा, बर्फ.

कृती. रोझमेरीचे तुरे, ब्ल्यूबेरी आणि मध एकत्र करून नीट वाटून घ्यावे. त्यात लिंबाचा रस आणि बर्फ घालून ते एकत्र कॉकटेल शेकरमधून शेक करून घ्यावे. एका उंच पेल्यात थोडा बर्फ घालावा त्यावर हे मिश्रण ओतावे. आता यावर शीतपेय घालावे आणि रोझमेरीच्या तुऱ्यांनी सजवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT