Ajwain Ladoo sakal
फूड

Ajwain Ladoo Recipe: हिवाळ्यात खा ओव्याचे पौष्टिक लाडू, सर्व आजारांमधून होईल सुटका!

हिवाळ्यात बनवा ओव्याचे पौष्टिक लाडू, जाणून घ्या रेसिपी

Aishwarya Musale

खाण्यापिण्याच्या दृष्टीने हिवाळा ऋतू खूप चांगला असतो. परंतु या ऋतूतील थंडीमुळे लोकांना गुडघेदुखी, पाठदुखी किंवा मज्जातंतूच्या वेदनांसह हाडांशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत सारखं औषध घेणेही हानिकारक ठरते.

म्हणूनच हिवाळ्याच्या हंगामात भारतीय स्वयंपाकघरात जवस, मेथी, ओवा आणि गुळाचे लाडू बनवले जातात आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोज सकाळ संध्याकाळ एक एक लाडू खाल्ल्यास हिवाळ्यात सर्दी आणि वेदनांचा त्रास होणार नाही.

हिवाळा सुरू झाला गोंड-कडू लाडूंची पर्वणी असते. यातील एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे ओव्याचे लाडू. हे लाडू खायला जेवढे चविष्ट असतात तेवढेच ते शरीराला ऊर्जाही देतात. हे लाडू थंडीच्या मोसमात खाल्ले जातात. कारण या ऋतूत आपली पचनशक्ती मजबूत बनते आणि हे लाडू सहज पचवता येतात. चला तर मग पाहू ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

लागणारे साहित्य 

  • 200 ग्रॅम ओवा

  • दोन वाटी गव्हाचे पीठ

  • अर्धा वाटी बदाम

  • अर्धा वाटी पिस्ता 

  • अर्धा वाटी अक्रोड

  • भोपळ्याच्या बीया

  • अर्धा वाटी काजू

  • एक चमचा वेलची पावडर 

  • एक चमचा हळद पावडर

  • जायफळ पावडर

  • पाव वाटी खसखस 

  • 50 ग्रॅम डिंक

  • तिन वाटी गूळ

  • खिसलेले सुके खोबरे

  • मखाने

  • तूप

कृती:

ओव्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वातआधी एक जड तळाची कढाई घ्यावी. गॅसवर ठेवून तूप गरम करा.

तूप वितळल्यावर त्यात डिंक घालून मध्यम आचेवर तळून घ्या. डिंकाचा रंग गोल्डन ब्राऊन झाला की गॅस बंद करा. डिंक बाहेर काढा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या.

थोडा थंड झाल्यावर डिंक कुस्करून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता कढईत तूप पुन्हा गरम करून त्यात गव्हाचे पीठ मध्यम आचेवर भाजून घ्यावे.

पीठ भाजताना सतत ढवळत राहा, जेणेकरून ते जळणार नाही. पीठाचा रंग हलका तपकिरी व्हायला लागला की त्यात ओवा,बदाम,पिस्ता,अक्रोड,काजू,सुके खोबरे,मखाने मंद आचेवर परतून घ्यावे.

आता हे मिश्रण पॅनमधून काढून थंड होऊ द्यावे आणि त्यात डिंक व गूळ टाकून मिक्सर मधून फिरवून घ्यावे.

आता या मिश्रणात जायफळ पावडर भोपळ्याच्या बीया खसखस हळद पावडर वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा मिश्रण चांगले मिक्स करा आणि या मिश्रणाचे लाडू बनवा. सर्व मिश्रणाचे एक एक करून लाडू बनवा.

अशा प्रकारे तुमचे चविष्ट आणि हेल्दी  ओव्याचे लाडू तयार आहेत.

थंडीमध्ये रोज एक लाडू खाल्ल्याने शरीराची ताकद वाढण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT