Can we eat meat and yogurt together Sakal
फूड

मांसाहारासह दह्याचे सेवन करावे की करू नये? जाणून घ्या तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण माहिती VIDEO

चिकन, तळलेल्या-शिजवलेल्या माशांसह दह्याचे सेवन करावे की करू नये, यावरून तुमचाही गोंधळ उडतोय का? यावर तज्ज्ञांचं काय म्हणणे आहे, जाणून घेऊया.

Harshada Shirsekar

आपला भारत देश वेगवेगळ्या संस्कृती, भाषा, कला इत्यादी गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. सर्वात महत्त्वाचे आपल्या देशाला शेकडो वर्षांची खाद्यसंस्कृतीही लाभली आहे. येथे वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय्यांचीही संख्या भलीमोठी आहे. 

विशेष म्हणजे प्रत्येकाची पदार्थांचा आस्वाद घेण्याचीही पद्धत वेगवेगळी असल्याचं पाहायला मिळते. काहींना पाणीपुरीसोबत खाण्यासाठी कांदा हवा म्हणजे हवाच, तर काहींना बटाट्याची नव्हे तर रगड्याचीच सुकापुरी खायला आवडते. वडापावसोबत तळलेली मिरची, झणझणीत पदार्थांसोबत लिंबू-कांदा मिळालाच नाही, तर काहींना जेवल्यासारखे वाटतच नाही; म्हणजे एकूणच कसे सर्व काही साग्रसंगीत.

तसेच काहींना नॉनव्हेजचा आस्वाद घेताना चवीला रायता, दही ताटामध्ये लागतेच. पण चिकन, मासे, मटण यासारख्या पदार्थांसोबत दह्याचे सेवन करावे की करू नये? यामध्येही काही जणांना शंका असते. कारण नॉनव्हेजसह दह्याचे सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक असते, असा काही जणांचा समज असतो. 

पण खरंच यामुळे आरोग्यावर परिणाम होतात का? याबाबत माहिती देणारा व्हिडीओ Dr. Rebecca Pinto यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जाणून घेऊया त्यांनी याबाबत नेमकी काय माहिती दिली आहे.

नॉनव्हेजसोबत दह्याचे सेवन करावे की करू नये?

Dr. Rebecca Pinto यांनीही एक इन्स्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली होती, फिशसोबत दही खात असल्याची माहिती त्यांनी या स्टोरीच्या आपल्या फॉलोअर्संसोबत शेअर केली. ‘दह्यासोबत फिश खाऊ शकतो का?’ असा प्रश्न अनेकांनी त्यांना विचारला. 

Dr. Rebecca Pinto यांनी केलं शंकेचं समाधान

Dr. Rebecca Pinto यांनी सांगितले की, नॉनव्हेज पदार्थांसोबत दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आपण करू शकता. यामुळे शरीरास कोणत्याही प्रकारचे अपाय होत नाहीत. पुढे त्या असंही म्हणाल्या की, ‘जेव्हा आपणास मांसाहार किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवते, त्यावेळेस हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे टाळावे. 

अन्यथा या दोन्ही पदार्थांचा आपण एकत्रित आस्वाद घेऊ शकता. कारण कित्येक मांसाहारयुक्त पदार्थांसोबत आपल्याला कोशिंबीर खाण्यास किंवा ताक पिण्यास दिले जाते. तसंच चिकन, मटण किंवा माशांचा स्वयंपाक करताना मॅरिनेट प्रक्रियेमध्ये दह्याचा वापर हमखास केला जातोच.

ही चूक करू नका

Dr. Rebecca Pinto यांनी सांगितल्याप्रमाणे खबरदारी म्हणून केवळ अ‍ॅलर्जीची समस्या असल्यास हे दोन्ही पदार्थ एकत्रित खाणे टाळावे.    

Content Credit Instagram @dr.rebeccapinto

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT