शरीराला प्रोटीन मिळावे म्हणून अनेकजण कच्चं अंड आणि दूध (Raw Milk with Egg)हे एकाच वेळी घेतात. अनेक लोकांचा असा समज आहे की शरीरासाठी ते अत्यंत लाभदायक असते. अंडी आणि दूध एकत्र घेणे हे फायदेशीर आहेच, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूस त्याचे काही तोटेही आहेत. कच्चा अंड्यामध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो जो आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो.
दुधाबरोबर अंडी घेतल्यामुळे बॅक्टरियल इन्फेक्शनचा (Bacterial Infections)धोका वाढतो. त्याच बरोबर सकाळच्या वेळेस अंड्या बरोबर दुध पिणे ही हानिकारक ठरू शकते. अंड्यांमध्ये कॅलरीज, प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल,फॉलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी 5, व्हिटॅमीन बी 6, व्हिटॅमीन बी 12, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन के हे पोषक (Healthy) घटक असतात. तर अंड्यांमधून शरीराला अधिक ऊर्जा (Energy)मिळते. हे जरी खरे असले तरी हे दोन्ही पदार्थ एकत्र घेऊ नये. याचे शरीराला नेमके कोणते नुकसान होते हे जाणून घेऊया...
अलर्जीची समस्या
अंड्यामध्ये हाय प्रोटिन्स असतात. अनेक वेळा काही लोकांना या हाय प्रोटिन्स ची एलर्जी होते. कच्चे अंडे आणि दूध यामध्ये प्रोटीनची मात्रा अधिक प्रमाणात असते जी आपल्याला हानीकारक ठरते. यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी अडथळा ,सूज येणे, उलटी होणे अशी समस्या निर्माण होऊ शकतात.
केस गळतीची समस्या
कच्ची अंडी घेतल्यामुळे आपल्या शरीरातील बायोटिन चे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे आपले केस अधिकच गळतात. त्याचबरोबर काही लोकांना त्वचेशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकते.
गर्भवती महिलांना धोका
कच्ची अंडी आणि दूध एकत्र घेतल्यामुळे याचा गर्भवती महिलांना त्रास होऊ शकतो. गर्भावस्थेमध्ये बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो.
पोटाशी संबंधित तक्रारी
दूध आणि कच्चे अंडी घेतल्यामुळे पोटदुखी, गॅस आणि असिडिटीचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. जर तुमच्या पोटाशी संबंधित काही आजार असतील तर कच्चे अंडी आणि दूध अजिबात घेऊ नका.
कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका
दूध आणि कच्चे अंडे एकत्र घेतल्याने कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol Level)प्रमाण वाढू शकते. बऱ्याचदा संपुर्ण अंडे दुधामध्ये मिक्स करतात. यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते यातून हृदयरोगाचा धोकाही वाढू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.