How to reduce uric acid: शरीरामध्ये युरीक अॅसिडचं प्रमाण वाढल्यास शरीरातील सांध्यामध्ये वेदना होवू लागतात. तसंच उठ-बस करण्यास त्रास होतो. उच्च रक्तदाबाची High Blood Pressure समस्या निर्माण होवू शकते. तसचं इतर काही आजारांना Illness देखील निमंत्रण मिळतं. Health Tips in Marathi Avoid Panner to solve problem of Uric Acid
यासाठीच युरीक अॅसिडची Uric Acid समस्या निर्माण झाल्यास वेळीच औषधोपचार करणं गरजेचं असतं. युरीक अॅसिडच्या समस्येमध्ये तुम्हाला काही खाण्याची काही पथ्य पाळणं देखील गरजेचं आहे. योग्य आहार Diet घेतल्यास ही समस्या कमी होऊ शकते.
काही पदार्थ असे आहेत ज्याच्या सेवनामुळे युरीक अॅसिडची समस्या निर्माण होऊ शकते. शिवाय जर तुम्हाला आधीपासूनच युरीक अॅसिडचा त्रास असेल तर तो जास्त बळावू शकतो. तसचं यामुळे संधीरोग वाढण्याची शक्यता बळावते. याच पदार्थांमधील एक पदार्थ म्हणजे पनीर Paneer.
अनेकजण मोठ्या आवडीने पनीरपासून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ खाणं पसंत करतात. अगदी पालक पनीरपासून, पनीर पकोडे, मोमोज, पनीर पराठे असे अनेक पनीरचे पदार्थ अनेकजण मोठ्या आवडीने खातात. मात्र जास्त प्रमाणात पनीरचं सेवन केल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. यामुळे युरीक अॅसिड वाढण्याची शक्यता वाढू शकते.
हे देखिल वाचा-
युरीक अॅसिडच्या समस्येत पनीर खाणं योग्य आहे का?
अलिकडे युरीक अॅसिडची समस्या वाढताना दिसतेय. अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. जास्त प्रोटीनयुक्त आहार खाण्यावर भर दिल्याने देखील ही समस्या वाढते. १०० ग्रॅम पनीरमध्ये जवळपास २० ग्रॅम प्रोटीन असतं. जास्त प्रोटीनच्या सेवनामुळे शरीरात प्युरीनचं प्रमाण वाढू लागतं. हे प्युरिन हाडांच्या सांध्यांमध्ये साचू लागतं.
प्युरीनच्या विघटनातून युरीक अॅसिड शरीरात तयार होत असतं. शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम किडनी करते. मात्र जेव्हा शरीरामध्ये युरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं तेव्हा किडनीला ते योग्यरित्या फिल्टर करणं अशक्य होतं. परिणामी ते शरीराच्या सांध्यांमध्ये साचू लागतं.
मेटाबोलिज्मवर परिणाम- युरीक अॅसिडच्या समस्येमध्ये पनीरचं सेवन केल्यास शरीराला नुकसान होऊ शकतं. पनीरमध्ये फायबर उपलब्ध नसून त्यात केवळ फॅट्स आणि प्रोटीन उपलब्ध असतं. यामुळे याचा मेटाबोलिजमवर परिणाम होतो. यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंद होते.
यामुळे प्रोटीनचं योग्य प्रकारे पचन होत नाही. परिणामी यातून निघणारं प्युरीन शरीरात वाढतं आणि युरीक अॅसिडचं प्रमाण वाढतं.
हे देखिल वाचा -
संधीरोगाचा त्रास वाढू शकतो- संधीरोग समस्येमध्ये वेदना कमी होण्यासाठी फायबरयुक्त आहार घेणं गरजेचं असतं. पनीरमध्ये मात्र फायबर उपलब्ध नसून प्रोटीन जास्त असतं. तसचं यात वेदना कमी करण्यासाठी गरजेचे असलेले अँटीइंफ्लेमेटरी गुण नसतात. त्यामुळेत पनीरच्या सेवनाने संधीरोगातील वेदना वाढू शकतात. यामुळेत पनीरचं सेवन टाळावं.
यासाठीच युरीक अॅसिडच्या समस्येमध्य आहारातून पनीरचं प्रमाण कमी करावं त्याएवजी सफरचंद, केळी, चेरी अशा फळांचा समावेश तुम्ही करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.