सकाळी नाश्त्यामध्ये आपण अनेक प्रकारचे पदार्थ खातो. जे करण्यास सोपे असतील आणि हेल्दी असतील असे पदार्थ नाश्त्यामध्ये प्रामुख्याने खाल्ले जातात. इडली हा एक असा पदार्थ आहे जो नाश्त्यामध्ये सर्वांच्या आवडीचा आहे.
आतापर्यंत, तुम्ही नाश्त्यामध्ये रव्याची इडली, तांदूळ आणि डाळींपासून बनवली जाणारी इडली, ओट्सची इडली, अशा कितीतरी प्रकारच्या इडली तुम्ही ट्राय केल्या असतील. परंतु, तुम्ही गाजरपासून बनवली जाणारी इडली कधी खाल्ली आहे का ? कदाचित काहींनी खाल्ली असेल तर काहींनी हे नाव पहिल्यांदा वाचले असेल.
गाजरापासून विविध प्रकारचे सॅलेड्स, गाजर हलवा असे कितीतरी प्रकार बनवले जातात आणि आवर्जून खाल्ले देखील जातात. आज आपण चविष्ट हेल्दी गाजर इडलीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
१ मोठे गाजर किसलेले
१ मोठे गाजर खास प्युरीसाठी
१ कप रवा
अर्धा कप दही
३-४ हिरव्या मिरच्या
आल्याचे २-३ तुकडे
३ चमचे तेल
१ पॅकेट इनो
१ चमचा मोहरी
१ कप पाणी
कढीपत्ता
हेल्दी गाजर इडली बनवण्यासाठी सर्वात आधी गाजर धुवून घ्या. त्याची साल काढा आणि त्याचे लहान तुकडे करा. या गाजरामध्ये हिरवी मिरची, आलं आणि अर्धा कप पाणी घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून त्याची बारीक पेस्ट करा.
ही पेस्ट तयार केल्यानंतर, आता आणखी एक गाजर धुवा, ते किसून घ्या. आता गाजराची तयारी पूर्ण झाल्यानंतर, रव्याचे बॅटर तयार करून घ्या. या बॅटरसाठी १ कप रवा, अर्धा कप दही, त्यात गाजर प्युरी, किसलेले गाजर आणि १ कप पाणी मिसळा.
आता, या इडलीच्या बॅटरमध्ये मीठ घाला आणि हे बॅटर १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. आता हे बॅटर रेडी होईपर्यंत दुसऱ्या बाजूला इडलीच्या भांड्याला तेल लावून ठेवा. तडका तयार करण्यासाठी एका भांड्यात २ चमचे तेल गरम करून घ्या, त्यात अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग घालून परतून घ्या. नंतर, त्यात कढीपत्ता घालून छान तडका द्या आणि गॅस बंद करा.
इडलीच्या बॅटरमध्ये हा तडका आणि १ पॅकेट इनो घालून छान मिक्स करा. त्यानंतर इडलीच्या भांड्यात इडलीचे पीठ लावून घ्या आणि हे भांडे गॅसवर १० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, इडली तयार झाली की नाही हे तपासून बघा. पुढील १५ मिनिटांमध्ये हेल्दी गाजर इडली तयार असेल. आता, सॉस, खोबऱ्याची चटणी किंवा सांबरसोबत ही चविष्ट गाजर इडली सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.