Makhana Recipe:
Makhana Recipe: Sakal
फूड

Makhana Recipe: मखाणा फक्त भाजून नाही तर लंच अन् डिनरमध्ये बनवू शकता 'हे' चवदार पदार्थ

पुजा बोनकिले

Makhana Recipe: पोषक घटकांनी युक्त असे मखाणा खाणे आरोग्यसाठी फायदेशीर असते. त्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. मखाणा भाजून खाण्याव्यतिरिक्त तुम्ही अनेक प्रकारच्या रेसिपीही बनवू शकता.

माखणामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील त्यात असते. तुम्ही मखाण्यापासून पुढील पदार्थ बनवून आस्वाद घेऊ शकता.

शाही मखाना मटार

साहित्य

१ कप मखना

१/२ कप वाटाणा

१ चमचा तूप

ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य

2 टोमॅटो

1 टीस्पून आलं

1/4 कप काजू (उकडलेले)

2 हिरव्या मिरच्या

1 टीस्पून तिखट

1/4 टीस्पून हळद

1 टीस्पून धने पावडर

चवीनुसार मीठ

तडका देण्यासाठी लागणारे साहित्य

1 छोटा तुकडा दालचिनी

2 हिरव्या वेलची

1/2 टीस्पून जिरं

4 चमचे तूप

पद्धत

सर्वात आधी कढईमध्ये तूप गरम करून मखणा भाजून घ्या आणि मटार ब्लँच करा .

टोमॅटो, आले, हिरवी मिरची आणि काजूचे पाणी गाळून तेही बारीक करून घ्या.

नंतर तूप गरम करा, मसाल्यांना तडका द्या आणि दोन मिनिटांनी टोमॅटो पेस्ट घाला.

नंतर त्यात काजूची पेस्ट टाका आणि थोडे पाणी घालून शिजू द्यावे.

नंतर त्यात मखाणा आणि वाटाणा मिक्स करावे.

10 मिनिटांनी गॅस बंद करा.

क्रीम आणि हिरवी कोथिंबीर घालून आस्वाद देऊ शकता.

मखाणा भेळ

मखाणा भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप मखणा

1/2 कप भाजलेले शेंगदाणे

1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची

2 टीस्पून बारिक चिरलेला टोमॅटो

1 टीस्पून पुदिना पावडर

1 टीस्पून ताजे डाळिंबाचे दाणे

7-8 कढीपत्ता

तुप

पद्धत

एका कढईमध्ये तुप गरम करून मखाणा भाजून घ्या.

नंतर शेंगदाणे भाजून घ्या.

नंतर कढईत तूप गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता , हिरवी मिरची, शेंगदाणे, भाजलेले मखना, मीठ, पुदिना पावडर घाला आणि नीट मिक्स करून घ्या.

शेवटी डाळिंबाचे दाणे टोमॅटो घालून आस्वाद घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

Hathras stampede: सत्संगातील मृतदेहांचा खच पाहून आला हृदयविकाराचा झटका, जवानाचा जागेवरच मृत्यू...

IPL 2025 Auction : रिटेंशनवरून कोणताही तोडगा नाही; खेळाडू संख्येवरून फ्रेंचायजी एकमेकांशीच भिडले

Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT