वनस्पतीजन्य आधारित मांसामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. शिवाय ते अल्ट्रा प्रक्रिया केलेले असते. त्यामुळे ते खाण्याचे अनेक फायदे तोटे आहेत.
मटण, चिकन आवडणारी अनेक लोकं आहेत. पण आता वेगन झालेल्या लोकांनी वनस्पतीजन्य आहार (Plant-Based Meat) आपलासा केला आहे. यात दुग्धजन्य पदार्थ, तसेच प्राण्यांचे मटण, चिकन खाल्ले जात नाही. म्हणजे तुम्ही जर चिकन बर्गर खाणार असाल तर त्याची टिक्की ही साहजिकच चिकनची असते. पण, प्लांट बेस मिटमध्ये सोया, बटाटा , नारळ आणि सूर्यफूल तेलावर प्रक्रिया करून मांसयुक्त मिश्रण केले जाते. ती टिक्की तुम्ही खाऊ शकता. मात्र मॅकडोनाल्डचा क्वार्टर पाऊंडर पॅटीतील कॅलरी आणि फॅटची पातळी बघता यात सहापट जास्त सोडियम असते.
वनस्पतीजन्य मांसाहाराची जागतिक बाजारपेठ २०३० मध्ये US$85 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या पदार्थांमध्ये ज्यामध्ये बर्गर, सॉसेज, नगेट्स, ग्राउंड मीट आणि सीफूड पर्यायांचा समावेश आहे. अभिनेता रितेश देशमुख हा अशा पदार्थांचा पुरस्कर्ता आहे.
पौष्टीक फायदे आहेत का? (What’s the nutritional benefit?)
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, वनस्पतीजन्य आधारित खाद्यपदार्थांचे पौष्टिक फायदे कमी आहेत. सिंगापूर इन्स्टिट्यूट फॉर फूड अँड बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशनच्या संशोधकांनी प्राणी मुक्त पदार्थ असलेल्या पण प्लांट बेस असलेल्या बेकन(bacon) , चिकन, बीफ बर्गर आणि आइस्क्रीमचा अभ्यास केला. याविषयी ड्यूक मॉलिक्युलर फिजिओलॉजी इन्स्टिट्यूटचे पोस्टडॉक्टरल सहयोगी स्टीफन व्हॅन व्हिलेट म्हणाले की, जीवनसत्वे आणि खनिजे असूनही पौष्टीक पदार्थ म्हणून तितकेसे योग्य नाहीत. कारण वनस्पतींपासून बनवलेले मांस हे गायीपासून बनवलेले मांस नसते आणि गायीपासून बनवलेले मांस हे वनस्पतीपासून बनवलेले मांस नसते. कारण प्राणी स्त्रोतांचा विचार केल्यास, मांस, दूध आणि अंडी या पदार्थांत संपूर्ण प्रथिने असतात, त्यामध्ये आपल्याला आहारात आवश्यक असलेले नऊ अमीनो ऍसिड असतात. फळे, भाज्या, नट, बिया आणि धान्ये यांसारख्या वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांमध्ये अनेकदा यापैकी एक किंवा अधिक अमीनो ऍसिड नसतात . शिवाय ते एकत्रितपणे खावे लागतात.
असे केले संशोधन
व्हॅन व्हीलेट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९० वनस्पतीजन्य आधारित मांस पदार्थांची गवत-भरलेल्या ग्राउंड गोमांसशी तुलना केली. त्यांना आढळले की, त्यापैकी 90 टक्के परिणाम वेगळे आहेत. वनस्पतीवर आधारित मांस पर्यायांमध्ये क्रिएटिन, टॉरिन आणि अँसेरिन सारख्या विशिष्ट अमीनो ऍसिड आणि डेरिव्हेटिव्हजचा अभाव आहे, "या सर्वांचा आपल्या आरोग्य, मेंदूचे कार्य तसेच स्नायूंच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो,असे व्हॅन सांगतो. तसेच, पॉलिफेनॉल आणि अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात वनस्पतीजन्य मांसामध्ये आढळतात. काही पोषक द्रव्ये प्राण्यांच्या स्त्रोतांकडून आणि काही वनस्पतींमधून अधिक चांगल्या प्रकारे मिळतात.
वनस्तपीजन्य मांसाहाराचे भविष्य काय? (The future of plant-based meats)
आतापर्यंत , वनस्पतीजन्य मांस बनविणाऱ्या कंपन्यांनी त्याच्या उत्पादनांची चव, पोत आणि टेक्श्चर यावर लक्ष केंद्रित केले. हे उत्पादन इतके तंतोतंत करण्यात आले की लोकांना ते खरे मांस आहे असे वाटावे. सध्या असे मांस खाण्याचे मार्केट हे खूप लोकप्रिय होते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.