Healthy Snacks  esakal
फूड

Healthy Snacks : ऑफिसमध्ये एनर्जेटीक रहायला मदत करतील असे भन्नाट पदार्थ

ऑफिसच्या कामादरम्यान अनेकांना भूक लागते

सकाळ डिजिटल टीम

Healthy Snacks : ऑफिसच्या कामादरम्यान अनेकांना भूक लागते, किंवा अनेकांना काम करतांना काही ना काही खाण्याची सवय असते, अशात लोकं काम करता करता चिप्स, बिस्किट किंवा चॉकलेट खातात. अनेकांचा असा समजही असतो की खाता खाता काम केलं तर ते लवकर होतं. काही लोक अभ्यास करता करता किंवा काम करता करता काहीतरी चघळत असतात.

आता घरी असाल तर तुम्ही भूक लागल्यावर काहीतरी खाऊ शकतात; पण ऑफिसमध्ये असाल तर? तेव्हा हे जरा कठीण होतं. अशात लोकं मग स्नॅक्सच्या नावाखाली काहीतरी जंक फूड आणि बाहेरचे पदार्थ खातात; पण हे धोक्याच ठरू शकतं.

मुळात बाहेरचं खाणं हे चुकीचच असत, चिप्स, बिस्किट, चॉकलेट अशा गोष्टी खाल्याने आपलं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो आणि याने वजनही वाढत. त्यापेक्षा तुम्ही हे घरगुती स्नॅक्स खाऊ शकतात.

घरगुती आणि हेल्दी स्नॅक्स खाण्याचे फायदे:

1. दर चार तासांनी काहीना काही खाल्ल्याने आपली मेटापॉलीझम प्रोसेस व्यवस्थित सुरू राहते आणि शरीरात एनर्जी पण राहते.

2. स्नॅक्स खाल्ल्याने जर चुकून रक्तातली साखरेची पातळी कमी झालेली असेल तर ती भरून निघते.

3. एकदा का तुम्हाला घरगुती स्नॅक्सची सवय लागली की, तुम्ही जंक फूड आपोआप कमी कराल.

कोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकतात?

1. खाकरा

गुजराती खाखरा हा गव्हाच्या पिठापासून बनवला जाणारा पदार्थ आहे. खाकऱ्यात गव्हाच्या पिठासोबतच मेथी, हळद आणि हिंग असे पदार्थ असतात ज्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

2.मखाना

मखाना मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात जे आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. यामध्ये एंटीऑक्सीडेंट, एंटी इन्फ्लेप्लेमेंटरी आणि एंटी ट्यूमर इत्यादी गुण असतात. मखाने खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि लूज मोशनचा त्रास होत नाही.

3. शेंगदाण्याची चिक्की

शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये मुळातच गूळ आणि शेंगदाणे असतात, यामुळे आपले हिमोग्लोबीन नियंत्रित राहते आणि आपल्याला एनर्जी मिळते.

4. सुका मेवा

सुका मेवा जसे की काजू, बदाम, किसमिस, अक्रोड, अंजीर, पिस्ता यांमध्ये खूप पोषक घटक असतात आणि याने शरीराला खूप फायदे होतात.

5. फ्रूट सॅलेड

तुम्ही वेगवेगळी फळे चिरूनही ऑफिसमध्ये नेऊ शकतात, फळं खाणं हे शरीरासाठी कधीही चांगलं. त्यामुळे तुम्ही सॅलेड खाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT