Holi 2024 Recipies esakal
फूड

Holi 2024 Recipies : होळी पार्टीला स्वीट कॉर्नपासून घरच्या घरी बनवा ‘हे’ चविष्ट हेल्दी स्नॅक्स, एकदम सोपी आहे रेसिपी

Holi 2024 Recipies : सध्या देशभरात होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. रविवारी होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात आज रंगांची होळी खेळली जात आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Holi 2024 Recipies : सध्या देशभरात होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. रविवारी होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात आज रंगांची होळी खेळली जाते. भारतातील अनेक राज्यांमध्ये हा रंगोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. आपल्याकडे याला धूलिवंदन म्हटले जाते. या धूलिवंदनाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन काही जण करतात. या पार्टीला मग पाहुण्यांसाठी विविध प्रकारचे स्नॅक्स बनवले जातात.

स्वीट कॉर्नला ज्याला मका किंवा कॉर्न असे ही म्हटले जाते. या मक्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. यामध्ये खास करून व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटिनचे विपुल प्रमाण असते. हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. मक्यापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आवर्जून बनवले जातात. मका आपल्या हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आपली पचनक्रिया देखील मजबूत राहते.

आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणाऱ्या मक्यापासून अनेक प्रकारच्या चविष्ट आणि हेल्दी डिशेस बनवल्या जातात. आज आम्ही होळी आणि धूलिवंदनानिमित्त तुम्हाला स्वीट कॉर्नपासून बनवल्या जाणाऱ्या काही हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी सांगणार आहोत, ज्या तुम्ही आज पाहुण्यांसाठी घरच्या घरी बनवू शकता.

स्वीट कॉर्न चाट

स्वीट कॉर्न अर्थात मक्यापासून तुम्ही हेल्दी आणि टेस्ट चाट बनवू शकता. हे चाट बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज भासणार नाही. मका, कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, तिखट, मीठ आणि चाट मसाला इत्यादी साहित्याची तयारी तुम्हाला करावी लागेल.

हे चाट बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये स्वीट कॉर्न घ्या. यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घाला. हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर, त्यात लाल तिखट, लिंबाचा रस, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. तुमचे हेल्दी आणि टेस्टी स्वीट कॉर्न चाट खायला तयार आहे.

मक्यापासून बनवा भजी

स्वीट कॉर्न अर्थात मक्यापासून तुम्ही चविष्ट पकोडे किंवा भजी बनवू शकता. यासाठी सर्वात आधी स्वीट कॉर्न उकळून घ्या. त्यानंतर, ते गार झाल्यावर चांगले स्मॅश करून घ्या. आता या स्मॅश केलेल्या कॉर्नमध्ये थोडे बेसन, रवा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, धणे, हळद, तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.

आता हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर, कढईत तेल घालून त्यात हे गरमागरम कॉर्न भजी तळून घ्या. छान सोनेरी रंग येईपर्यंत ते तळून घ्या. त्यानंतर, टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

SCROLL FOR NEXT