panipuri sakal
फूड

पावसाळ्यात पाणीपुरी खायचं टेन्शन आहे? घरीच बनवा हेल्दी आणि टेस्टी पाणीपुरी

पावसाळ्यात घरीच बनवा टेस्टी पाणीपुरीचे पाणी, ट्राय करा ही सोपी रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

पाणीपुरी ही प्रत्येकाला आवडते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पानीपुरी प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. पावसाळ्यात अनेकदा आपल्याला उघड्यावरचे खायला मनाई केली जाते. कारण असं खाणं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं. पण पावसाळा असो किंवा उन्हाळा किंवा हिवाळा पाणीपुरीचा मोह कुणालाच आवरता येत नाही.

सध्या पावसाळा सुरु आहे आणि साथीचे रोग वाढले आहे. त्यामुळे बाहेरचे खाणे आपण सर्वांनी टाळणे गरजेचे आहे. त्यात जर तुम्हाला पाणीपुरी खावीशी वाटत असेल तर तुम्ही घरबसल्या पानीपुरीचा आस्वाद घेऊ शकता.

अनेकदा घरी पाणीपुरी बनवताना पाणीपुरीचे पाणी कसे टेस्टी बनवावे, हे कळत नाही. पण आज आम्ही तुम्हाला आज खास पानीपुरीचे पानी कसे बनवावे, हे सांगणार आहोत.

साहित्य

  • ६ ते ७ मोठे कप पाणी, थोडासा पुदिना

  • लिंबाएवढी चिंच,

  • २-३ हिरव्या मिरच्या

  • लहानसा आल्याचा तुकडा

  • १ चमचा जिरे, २,३ लवंगा

  • चमचा मिरपूड

  • थोडे लाल तिखट

  • थोडा गूळ

  • मीठ

  • ३ लिंबाचा रस

  • १ वाटी मोड आलेले मूग थोडी हळद घालून वाफवून घ्यावेत.

  • २/३ उकडलेले बटाटे.

पाणीपुरी पाणीची कृती?

  • चिंचेचा कोळ तयार करून घ्यावा.

  • मिरच्या, आले, पुदिना, जिरे, लवंगा, मिरपूड, तिखट, मीठ ह्यांची बारीक चटणी वाटून घ्यावी.

  • नंतर वाटलेली चटणी चिंचेचा कोळ व गूळ एकत्र करावे.

  • ह्या पाण्यात एका लिंबाचा रस घालावा, म्हणजे चव फार सुंदर येते.

  • प्रत्येक पुरी वरच्या बाजूने थोडी फोडून त्यात ८-१० मूग व थोडा बटाट्याचा चुरा भरून व वरील पाण्यात बुडवून प्लेट तयार कराव्यात.

  • लगेचच खाव्यात. किंवा प्रत्येकाला एका वाटीत थोडेसे तयार पाणी व मूग घातलेल्या ७-८ पुऱ्या द्याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT