Aloo Bread Pattice esakal
फूड

Aloo Bread Pattice : नाश्त्याला झटपट बनवा चमचमीत बटाटा ब्रेड पॅटिस, वाचा सोपी रेसिपी

Monika Lonkar –Kumbhar

Aloo Bread Pattice : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय खावे? असा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा येतो. नेहमीचे हेच पदार्थ खाऊन बोअर व्हायला होते. काहीतरी चमचमीत खाण्याची सगळ्यांचीच इच्छा होते. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसिपी सांगणार आहोत.

या रेसिपीचे नाव बटाट पॅटिस असे आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बनवायला सोपा असणारा हा पदार्थ करण्यासाठी फार साहित्याची गरज पडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात बटाटा रेसिपीची ही सोपी पद्धत.

बटाटा पॅटिस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • बटाटे – ३-४

  • ब्रेडचे स्लाईस – ८-९

  • बेसन – १ वाटी

  • लसूण-मिरचीची पेस्ट

  • लाल तिखट – १ चमचा

  • लिंबाचा रस – १ चमचा

  • धने-जीरा पावडर – २ चमचे

  • चाट मसाला – अर्धा चमचा

  • मीठ चवीनुसार

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • तेल आवश्यकतेनुसार

बटाटा पॅटिस बनवण्याची सोपी पद्धत

  • सर्वात आधी बटाटे उकडून सोलून घ्या.

  • आता बटाटे स्मॅश करून त्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, लसूण-मिरचीची पेस्ट, मीठ, धने-जीरा पावडर, लिंबाचा रस, कोथिंबीर, मीठ घालून हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या.

  • आता दोन ब्रेडचे स्लाईस ओलसर करून घ्या.

  • त्यानंतर, त्यात हे मिश्रण भरा.

  • ब्रेड स्लाईसच्या वरच्या बाजूने थोडे पाणी लावावे.

  • आता बेसन पीठ एका बाऊलमध्ये घेऊन घट्टसर भिजवून घ्या.

  • आता तयार केलेले ब्रेड पॅटिस बेसन पीठात घोळवून तळून काढावेत.

  • सोनेरी रंग येईपर्यंत ब्रेड पॅटिस खरपूस तळून घ्या.

  • आता गरमागरम ब्रेड पॅटिस टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची हिरवी चटणी आणि हिरवी मिरचीसोबत सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT