Bharli Mirchi Recipe Sakal
फूड

Bharli Mirchi Recipe: घरीच झटपट चवदार बनवा भरली मिरची, नोट करा रेसिपी

पुजा बोनकिले

सकाळ साप्ताहिक- मिना काळे

Bharli Mirchi Recipe: जेवणात रोज कोणती भाजी बनवावी हा प्रश्न अनेक महिलांना पडतो. तुम्ही एकाच प्रकराची ढोबळी मिरची खाऊन बोर झाले असाल तर भरली मिरची तयार करू शकता. भरली मिरची दुपारी किंवा रात्री जेवणात तयार करू शकता. भरली मिरची बनवणे खुप सोपे आहे. तसेच घरातील सर्व लोकांना देखील भाजी आवडेल. ढोबळी मिरची कशी बनवावी आणि कोणते साहित्य लागते हे जाणून घेऊया.

भरली मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य

आठ ते दहा लांबट आकाराच्या सिमला मिरच्या

२ बटाटे

१ बीट

४ हिरव्या मिरच्या

४ लसूण पाकळ्या

मीठ

कोथिंबीर

ब्रेड क्रम्ब्स

अर्धा वाटी तांदूळ पिठी

पाव वाटी बेसन

तेल

भरली मिरची बनवण्याची कृती

लांबट सिमला मिरच्या उभ्या चिरून त्यातील बिया काढून टाकाव्यात.

बटाटे व बीट उकडून, साले काढून किसून घ्यावीत.

मीठ, मिरच्या आणि लसूण वाटून घ्यावेत आणि त्यात कोथिंबीर चिरून घालावी.

त्यात तांदूळ पीठ आणि बेसन घालून थोडे पाणी घालून सगळ्याचे मिश्रण करून गोळा करावा.

उभ्या कापलेल्या सिमला मिरच्यांमध्ये हे सारण भरावे आणि बाहेरूनही लावावे.

ह्या मिरच्या ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळून घ्याव्यात.

तव्यावर थोडे तेल टाकून गरम करायला ठेवावा.

त्यात ह्या मिरच्या सोडाव्यात झाकण ठेवून एक वाफ आणावी.

नंतर दुसऱ्या बाजूने पण थोडे तेल सोडून परतून घ्याव्यात.

गुलाबी रंगाच्या ह्या मिरच्या स्टार्टर म्हणूनपण चांगल्या लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उज्जैनच्या Mahakal Temple ची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

हॅरी पॉटर फेम आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री Maggie Smith यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

Pune Crime News: मुळशीच्या जमिनीचा वाद; दुहेरी हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप

Pune Crime: 'फोनवर कोणाशी बोलतोस?', असं विचारल्याने चिडलेल्या प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT