Coconut Pineapple Burfi Recipe: सणासुदीला लोक बाहेरून मिठाई आणतात आणि खातात. आता पुढील महिन्यात नवरात्र आणि दिवाळी आहे. सर्वत्र स्वच्छता झाली की गोड पदार्थ बनवायाला लागतील. यंदा बाहेरून मिठाई न आणता घरीच कोकोनट पाईनपॅल बर्फी बनवू शकता. ही बर्फी चवीला एकदम स्वादिष्ट आणि बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया कोकोनट पाईनपॅल बर्फी कशी बनवायची.
२ वाट्या खोवलेले नारळ
अर्धी वाटी पाईनपॅल ज्यूस
अर्धी वाटी साखर
३ थेंब पाईनपॅल एस्सेन्स
४ चमचे साजूक तूप
चांदीचा वर्ख
गॅसवर कढई ठेवावी.
कढई गरम झाली की त्यात साजूक तूप घाला.
खोवलेला नारळ घालावा.
मिश्रण चांगले गुलबट रंगावर परतून घ्या.
त्यात साखर पाईनपॅल ज्यूस आणि एस्सेन्स घालून मिश्रण चांगले कोरडे होईपर्यंत परतून घ्या.
मिश्रण कढईतून सुटू लागले की, एका ताटाला तूप लावून घ्या.
त्यामध्ये हे मिश्रण काढा.
पूर्ण थंड झाले की चांदीचा वर्ख लावा व हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.