Dahi Chutney  sakal
फूड

Dahi Chutney Recipe: दहीचा रायताच नाही तर चटणीही बनवली जाते, जाणून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दही चटणी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

Aishwarya Musale

भारतात चटणी खूप प्रसिद्ध आहे. नारळापासून भाज्या आणि फळांपर्यंतच्या चटण्या बनवल्या जातात. चटणीमुळे जेवणाची चवही द्विगुणित होते. म्हणूनच बहुतेक घरांमध्ये जेवणासोबत चटणी दिली जाते. बर तुम्ही कधी दही चटणी खाल्ली आहे का?

आम्ही पुदिना आणि कोथिंबीरच्या दही चटणीबद्दल बोलत नाही आहोत. दह्याची चटणी अनेक पदार्थ आणि पद्धतींनी बनवता येते. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दही चटणी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

दही चटणी राजस्थानी स्टाईलमध्ये बनवा

राजस्थानी पद्धतीची चटणी भारतभर प्रसिद्ध आहे. विशेषत: येथे बनवलेल्या लसणाच्या चटणीबद्दल जेवढे बोलू तेवढे कमीच आहे. राजस्थानात बनवलेली दही-लसूण चटणी तुम्ही ट्राय केली आहे का? नसेल तर आज ही रेसिपी घरीच करून पहा.

  • चटणी बनवण्यासाठी सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजवाव्यात.

  • आता पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि लसूण तपकिरी होईपर्यंत तळा.

  • लसूणमध्ये लाल मिरची, 2 चमचे धणे, 1 चमचे जिरे आणि अर्धा टीस्पून काळी मिरी घालून मंद आचेवर शिजवा.

  • काही वेळाने चटणीतून सुगंध यायला लागेल, मग गॅस बंद करा आणि पेस्ट थंड होण्यासाठी सोडा.

  • साधारण 10-15 मिनिटांनंतर सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाकून चांगल्या बारीक करा.

  • आता ही पेस्ट तेलात टाका आणि तेल वेगळे होईपर्यंत शिजवा.

  • आता त्यात एक चमचा मोहरी, १ चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि फेटलेले दही घाला.

  • वारंवार ढवळत राहा म्हणजे दही खराब होणार नाही.

  • साधारण ५ मिनिटांनी गॅस बंद करा.

  • दही लसूणची चटणी तयार आहे.

  • लसणाची चटणी साध्या भाताबरोबर स्नॅक्समध्ये खाऊ शकता.

दही-हिरवी मिरची चटणी

हिरव्या मिरचीमुळे जेवणाची चवही वाढते. जेवणाला चटपटीत बनवण्यासाठी हिरव्या मिरच्यांचा वापर केला जातो. हिरवी मिरची घालूनही चटणी बनवू शकता. दही-हिरव्या मिरचीची चटणी बनवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • प्रथम हिरव्या मिरच्या धुवून घ्या.

  • आता हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे करा.

  • चटणीची चव वाढवण्यासाठी हिरव्या मिरच्या ग्राइंडरमध्ये बारीक करण्याऐवजी किसणीवर बारीक करा.

  • त्यामुळे चटणीची चव वाढेल.

  • हिरवी मिरची बारीक वाटून घ्या. आता त्यात फेटलेले दही घाला.

  • चवीनुसार मीठ, हिंग आणि जिरेपूड घालून सर्वकाही मिक्स करावे.

  • आता तुमची दही आणि हिरव्या मिरचीची चटणी तयार आहे.

  • ही चटणी तुम्ही डाळ-भातापासून समोशापर्यंत कोणत्याही गोष्टीसोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT