Christmas 2023 esakal
फूड

Christmas 2023 : ख्रिसमस पार्टीसाठी घरच्या घरी बनवा ड्रायफ्रूट केक, एकदम सोपी आहे रेसिपी

Monika Lonkar –Kumbhar

Christmas 2023 : डिसेंबर महिन्याला सुरूवात झाली की, सर्वांना वेध लागतात ते नाताळचे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात २५ तारखेला हा ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्रीचे सुंदर डेकोरेशन केले जाते. विविध प्रकारचे केक्स, गिफ्ट्स, कुकीज आणि गोड पदार्थांची मेजवानी असते.

लहान मुलांसाठी केक हा तर खूप जिव्हाळ्याचा आणि आवडीचा पदार्थ. लहानांसोबतच मोठ्या लोकांना ही या ख्रिसमसची मोठी क्रेझ असते. केकसोबत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ख्रिसमससाठी बनवले जातात. आज आपण घरच्या घरी सहज बनवला जाणाऱ्या ड्रायफ्रूट केकची रेसिपी जाणून घेणार आहोत.

ड्रायफ्रूट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • १ कप मैदा

  • अर्धी वाटी दही

  • अर्धा कप दूध

  • बेकिंग पावडर १ चमचा

  • अर्धा चमचा बेकिंग सोडा

  • २ चमचे दूध पावडर

  • ४-५ चमचे मिक्स ड्रायफ्रूट्स

  • १ चमचा व्हॅनिला इसेन्स

  • अर्धी वाटी तूप

  • अर्धी वाटी पीठीसाखर

  • चवीनुसार मीठ

ड्रायफ्रूट केक बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी एका भांड्यात मैदा चाळून घ्या.

  • त्यानंतर, त्यात बेकिंग पावडर, दूध पावडर आणि बेकिंग सोडा मिसळा.

  • आता या मिश्रणात चिमूटभर मीठ मिसळा.

  • त्यानंतर, दुसरे एक भांडे घ्या.

  • दुसऱ्या भांड्यात दही, पीठी साखर आणि तूप घालून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  • त्यानंतर, दह्याच्या या मिश्रणात मैद्याचे मिश्रण घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  • आता या मिश्रणात दूध घालून मिश्रण चांगले एकजीव करून घट्ट पेस्ट तयार करा.

  • आता, या पेस्टमध्ये व्हॅनिला इसेन्स घालून छान मिक्स करा.

  • त्यानंतर, या पेस्टमध्ये बारीक चिरलेले मिक्स ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा.

  • आता केक बेक करण्याचे भांडे घ्या. त्यानंतर, या केकच्या भांड्याला तूप लावून घ्या.

  • आता या भांड्यात केकचे मिश्रण घाला. त्यानंतर, हे भांडे जमिनीवर किंवा फरशीवर चांगले टॅप करून घ्या.

  • त्यानंतर, या केकच्या मिश्रणात बदामाचे बारीक काप घाला.

  • आता प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० डिग्री सेल्सिअसवर अर्धा तास केक बेक करा.

  • आता तुमचा ड्रायफ्रूट केक तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What Is Moral Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? पाच मुद्द्यांत जाणून घ्या प्रकरण

Vidhan Sabha Election 2024: ठरलं! आज दुपारपासूनच आचारसंहिता; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, तारखा होणार जाहीर

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 270 अंकांनी वधारला, निफ्टीही 25,200 च्या पुढे

बिग बॉस जिंकलेल्या सुरज चव्हाणच्या नावावर सुरू आहे धक्कादायक प्रकार; रीलस्टारने पोस्ट करत केली चाहत्यांना विनंती

Ben Stokes: 'मला काही देणं-घेणं नाही...', बाबर-शाहिनच्या पाकिस्तानी संघातून हकालपट्टीवर इंग्लंडच्या कर्णधाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT