Egg Bhurji Sandwich Recipe esakal
फूड

Egg Bhurji Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी अंडा भुर्जी सॅंडवीच, एकदम सोपी आहे रेसिपी

Egg Bhurji Sandwich Recipe : अंड्याच्या भुर्जीपासून बनवले जाणारे हे सॅंडवीच चवीला भन्नाट लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Egg Bhurji Sandwich Recipe : सकाळी उठायला उशीर झाला की, नाश्त्यामध्ये काय बनवावे? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. सकाळच्या गडबडीमध्ये काहीतरी झटपट होणारा पदार्थ आणि चवीला टेस्टी असणारा पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांची असते.

मग, असा पदार्थ कोणता? हा प्रश्न पडतो. परंतु, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुमच्यासाठी अंड्यापासून बनवली जाणारी एक टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट डिश घेऊन आलो आहोत.

या पदार्थाचे नाव आहे अंडा भुर्जी सॅंडवीच. अंड्याच्या भुर्जीपासून बनवले जाणारे हे सॅंडवीच चवीला भन्नाट लागते. आज या टेस्टी सॅंडवीचची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात अंडा भुर्जी सॅंडवीचची ही सोपी रेसिपी.

अंडा भुर्जी सॅंडवीच बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • २ अंडी

  • ब्रेडचे स्लाईस

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ टोमॅटो बारीक चिरलेला

  • १ शिमला मिरची बारीक चिरलेली

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • तेल

  • २ चमचे बटर

  • १ चिमूटभर काळी मिरी पावडर

  • चवीनुसार मीठ

  • लाल तिखट १ चमचा

  • ग्रीन चिली आणि रेड चिली सॉस

अंडा भुर्जी सॅंडवीच बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी अंडा भुर्जी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा.

  • आता तेल गरम झाले की, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घाला.

  • कांदा, टोमॅटो, शिमला मिरची तेलात चांगली परतून घ्या. आता यामध्ये लाल तिखट, काळी मिरी पावडर घालून चांगले शिजू द्या.

  • आता यामध्ये दोन अंडी फोडून टाका. या मिश्रणात अंडे एकत्र करून घ्या.

  • आता यामध्ये मीठ घालून भुर्जी चांगली परतून घ्या.

  • १५-२० मिनिटांमध्ये तुमची भुर्जी चांगली शिजेल. आता ही भुर्जी एका बाऊलमध्ये काढून घ्या.

  • त्यानंतर, ब्रेड स्लाईसला बटर लावून घ्या, त्यावर आता ग्रीन चिली आणि रेड चिली सॉस लावा.

  • आता यावर भुर्जी लावून घ्या.

  • सॅंडवीच मेकर किंवा तव्यामध्ये बटर घालून त्यावर हे ब्रेड स्लाईस सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.

  • तुमचे गरमागरम अंडा भुर्जी सॅंडवीच तयार आहे. टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीसोबत हे गरमागरम सॅंडवीच सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT