सकाळ साप्ताहिक- प्रणिता सचिन कुलकर्णी
Fried Momos Recipe: लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना मोमोज खायला आवडतात. पण मोमोज मैदापासून बनवले असल्याने अनेक लोक खाणे टाळतात. पण तुम्ही घरीच कणकिचा वापर करून स्वादिष्ट मोमोज बनवू शकता. हे मोमोज कमी वेळेत तयार होतात. तसेच छोटीशी भूक लागली असेल तर हे मोमोज बनूव शकता. स्वादिष्ट मोमोज बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे हे जाणून घेऊया.
एक पत्ता कोबी बारीक चिरून
४ वाट्या गव्हाचे पीठ
२ गाजरे बारीक चिरून
२ चमचे आले-लसूण पेस्ट
मीठ चवीनुसार
२ चमचे तिखट
तेल
कणकेचे फ्रॉईड मोमो बनवण्यासाठी सर्वात आधी गव्हाचे पीठ मळून वीस मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. तोपर्यंत मोमोंचे सारण तयार करून घ्यावे. सुरुवातीला कढईमध्ये २ चमचे तेल तापवावे. तेले गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कोबी घालून मंद विस्तवावर परतून घ्यावा. त्यानंतर गाजर, मीठ घालून परतून घ्यावे. कढईवर झाकण ठेवून एक वाफ येईपर्यंत मंद विस्तवावर भाज्या शिजवून घ्याव्यात. भाज्या जास्त मऊ शिजवू नयेत. त्यानंतर त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट घालून मिक्स करावे व गॅस बंद करावा. त्यानंतर मोमोसाठी मळलेले पीठ पुरीच्या आकारात लाटावे. त्या पुरीमध्ये तयार सारण भरून त्याला मोदकासारखा आकार द्यावा. तयार मोमो वाफवून घ्यावेत. वाफवून झाल्यानंतर १५ मिनिटे गार होण्यासाठी ठेवावे. गार झाल्यानंतर कढईमध्ये पुरेसे तेल घेऊन गरम तेलात मोमो तळावेत आणि शेजवान चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.