Curry Leaves Chutney : भारतीय स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी देखील कढीपत्ता फायदेशीर आहे.
कढीपत्त्याचा वापर केल्याने आपल्या जेवणाची चव सुधारते. त्यामुळे, अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवताना त्यांना कढीपत्त्याची फोडणी आवर्जून दिली जाते. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला कढीपत्ता विविध घटकांमध्ये मिसळून खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो. आज आपण कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
कढीपत्त्याची पाने
तेल
तिखट
मीठ
पांढरे तीळ
सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवा.
या पॅनमध्ये थोड तेल घालून त्यात कढीपत्त्याची पाने तळून घ्या.
पाने कुरकुरीत तळून झाली की ती थंड व्हायला एका बाऊलमध्ये काढून ठेवा.
त्यानंतर, पांढरे तीळ तेलात भाजून घ्या. तीळ सोनेरी झाले की गॅस बंद करा.
हे तीळ आता दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या.
तीळ थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि कढीपत्त्याची पाने एकत्रितपणे बारीक करून घ्या.
जास्त बारीक करू नका ओबडधोबड पूड केली तरी चालेल.
त्यानंतर, या मिश्रणात लाल तिखट, मीठ आणि तेल घालून चटणी मिक्स करून घ्या.
तुमची कढीपत्त्याची खमंग चटणी तयार आहे.
ही चटणी तुम्ही जेवणासोबत, पराठ्यांसोबत, भाकरी किंवा चपातीसोबत नक्कीच खाऊ शकता.
या चटणीमुळे तुमच्या तोंडाला छान चव येईल, यात काही शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.