how to make peri peri masala recipe Sakal
फूड

Peri Peri Masala Recipe: घरीच बनवा पेरी-पेरी मसाला अन् वाढवा फ्रेंच फ्राईज, स्प्रिंग रोलची चव

सकाळ डिजिटल टीम

फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा यांसारख्या चटपटीत पदार्थांची चव वाढवणारा मसाला म्हणजे पेरी पेरी. या मसाल्याचं नुसतं नाव जरी काढलं तरी त्याची चव जिभेवर रेंगाळते. कॅफेवाला चुकून जरी हा मसाला फ्रेंच फ्राईज वर टाकायचा विसरला तर आपसूकच अरे भाई पेरी पेरी बोला था, अस वाक्य तोंडून पडतं.

आपल्याकडे हल्ली अनेक पदार्थांवर हा मसाला घातला जातो. मस्त तिखट व तितकाच चविष्ट असा हा मसाला एखाद्या साध्या पदार्थांचीही लज्जत वाढवतो. सगळ्या पदार्थात घातला जाणारा हा पेरी पेरी मसाला विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीही आपण बनवू शकतो. तर कसं ते पुढीलप्रमाणे...

साहित्य

  • ओरेगॅनो - १ टेबलस्पून

  • काश्मिरी लाल मिरची पावडर - २ टेबलस्पून

  • आमचूर पावडर - १ टेबलस्पून

  • ड्राय आल्याची पावडर / सुंठ पावडर - १ टेबलस्पून

  • दालचिनी - १ काडी

  • वेलची पूड - १/४ टेबलस्पून

  • सैंधव मीठ - १ टेबलस्पून

  • काळीमिरी पूड - १ टेबलस्पून

  • साखर - १ टेबलस्पून

  • मीठ - १/२ टेबलस्पून

  • गार्लिक पावडर - १ टेबलस्पून

  • ड्राय ओनियन पावडर - १ टेबलस्पून

  • चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून

कृती

पेरी पेरी मसाला बनवण्यासाठी सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये एकत्र करा. नंतर त्याची बारीक पावडर होईपर्यंत ब्लेंड करा. पावडर तयार झाल्यावर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरुन ठेवा. तुम्ही तो एअरटाईट डब्यात साठवून कमीत कमी १ महिना वापरु शकता.

पेरी-पेरी मसाल्याचा वापर पास्तामध्येही करता येतो. यामुळे चव आणखी लज्जदार होते. मॅगी मसाला आणि त्याचे कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे. तुम्हाला हवे असल्यास हा मसाला तुम्ही सॅलडमध्येही घालू शकता.

हा मसाला टिकण्यासाठी कोणती काळजी घ्याल

  • मसाला वापरल्यानंतर बरणीचे झाकण घट्ट लावा. झाकण उघडे राहिल्यास मसाला खराब होतो.

  • मसाले नेहमी अंधाऱ्या जागी ठेवा. कारण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्याच्या स्वादामध्ये बदल होतो.

  • मसाल्याचा डबा गॅसजवळ ठेवू नका. उष्णतेमुळे मसाल्यांची चव खराब होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT