Poha Appe Recipe esakal
फूड

Poha Appe Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवा चविष्ट पोहे अप्पे, एकदम सोपी आहे रेसिपी

Poha Appe Recipe : पोह्यापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देखील बनवले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Poha Appe Recipe : भारतीय स्वयंपाकघरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. या खाद्यपदार्थांमध्ये पोह्यांचा देखील समावेश आहे. पोहे हा एक असा पदार्थ आहे की जो सकाळच्या नाश्त्याला आणि सायंकाळच्या नाश्त्याला ही बनवला जातो. नाश्त्यासाठी पोहे हा एक उत्तम पर्याय आहे. पोह्यापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देखील बनवले जातात. जसे की, पोहा कटलेट, पोह्यांचा पराठा इत्यादी.

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की पोह्यांपासून स्वादिष्ट अप्पे देखील बनवले जातात. हे अप्पे बनवायला अतिशय सोपे असून त्यासाठी फार साहित्याची गरज पडत नाही. पोह्यांपासून बनवले जाणारे अप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात. सकाळच्या गडबडीत बनवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात पोहे अप्पे बनवण्याची ही सोपी रेसिपी.

पोहे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • 1 वाटी पोहे (भिजवलेले)

  • बारीक चिरलेला टोमॅटो १

  • बारीक चिरलेला कांदा १

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • अर्धा चमचा खायचा सोडा

  • आवश्यकतेनुसार तेल

पोहे अप्पे बनवण्याची सोपी पद्धत

  • पोह्यांचे अप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये भिजवलेले पोहे काढून घ्या.

  • आता या भिजवलेल्या पोह्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घाला.

  • हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.

  • आता या मिश्रणात हलक्या हाताने पाणी मिसळून अप्पे बॅटर तयार करून घ्या.

  • अप्पे बॅटर तयार करून झाल्यावर त्यात अर्धा चमचा सोडा घाला.

  • १० मिनिटे पीठ तसेच झाकून ठेवा.

  • त्यानंतर, गॅसवर अप्पे पात्र गरम करायला ठेवा.

  • अप्पे पात्र गरम झाल्यावर त्यात थोड तेल घालून चमच्याच्या मदतीने अप्प्याचे पीठ घाला.

  • आता दोन्ही बाजूंनी अप्पे चांगले शिजवून घ्या.

  • आता गरमागरम अप्पे एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि हिरवी पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, 16 विधयेक सादर होणार

SCROLL FOR NEXT