Poha Paratha Recipe esakal
फूड

Poha Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट पोहा पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

Poha Paratha Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे नेहमीच खात असाल. पोहे हे बनवायला अतिशय सोपे असून ते चवीला अप्रतिम लागतात.

Monika Lonkar –Kumbhar

Poha Paratha Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे नेहमीच खात असाल. पोहे हे बनवायला अतिशय सोपे असून ते चवीला अप्रतिम लागतात. परंतु, तुम्ही कधी पोह्यांपासून बनवलेला खमंग आणि खुसखुशीत पराठा खाल्ला आहे का? जर तुम्ही असा पराठा ट्राय केला नसेल, तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला पोह्यांपासून बनवला जाणारा सोपा आणि चविष्ट पराठा कसा बनवायचा? त्याची रेसिपी सांगणार आहोत. शिवाय, हा पराठा बनवायला तुम्हाला जास्त साहित्याची गरज नाही पडणार. चला तर मग जाणून घेऊयात पोहा पराठ्याची ही सोपी रेसिपी.

पोहा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • २ कप पोहे

  • २ बटाटे उकडलेले (स्मॅश केलेले)

  • गव्हाचे पीठ २ कप

  • २ चमचे तीळ

  • कांदा बारीक चिरलेला

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • १ चमचा आले-लसणाची पेस्ट

  • १ गाजर किसलेले

  • १ चमचा लाल तिखट

  • अर्धा चमचा हळद

  • धणा पावडर अर्धा चमचा

  • अर्धा चमचा गरम मसाला

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार तेल

पोहा पराठा बनवण्याची सोपी पद्धत

  • पोहा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे ५-१० मिनिटांसाठी पाण्यात भिजत घाला.

  • आता पोह्यातील पाणी काढून घ्या आणि पोह्यात, स्मॅश केलेला बटाटा आणि गव्हाचे पीठ मिसळा.

  • आता या मिश्रणात मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणा पावडर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या.

  • पराठ्यासाठी हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या.

  • पीठ जर तुम्हाला पातळ वाटले तर त्यात आणखी गव्हाचे पीठ मिसळा.

  • आता या पीठापासून गोळे बनवा आणि लाटून घ्या.

  • एका बाजूला गॅसवर पॅन गरम करायला ठेवा आणि त्यात तेल किंवा तूप घालून पराठे भाजून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी पराठे सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्या.

  • आता हे गरमागरम पराठे दही, पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खायला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT