Potato Bread Balls Recipe esakal
फूड

Potato Bread Balls Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी अन् हेल्दी बटाटा ब्रेड बॉल्स, एकदम सोपी आहे रेसिपी

जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायचे असेल तर तुम्ही बटाटा आणि ब्रेडपासून बनवली जाणारी ही सोपी रेसिपी नक्कीच बनवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Potato Bread Balls Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक जण ब्रेड ऑम्लेट, सॅंडवीच, पराठा, पोहे, उपमा, इडली यांसारखे पदार्थ खातात. परंतु, अशा प्रकारचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायचे असेल तर तुम्ही बटाटा आणि ब्रेडपासून बनवली जाणारी ही सोपी रेसिपी नक्कीच बनवू शकता. शिवाय, सकाळच्या नाश्त्यामध्ये ही रेसिपी झटपट बनवता ही येते.

या रेसिपीचे नाव आहे बटाटा ब्रेड बॉल्स. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात बटाटा ब्रेड बॉल्सची ही सोपी रेसिपी.

बटाटा ब्रेड बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • बटाटा – २

  • ब्रेड स्लाईस ४-५

  • लाल तिखट १ चमचा

  • गरम मसाला अर्धा चमचा

  • चवीनुसार मीठ

  • चाट मसाला अर्धा चमचा

बटाटा ब्रेड बॉल्स बनवण्याची सोपी पद्धत :

  • सर्वात आधी बटाटे उकडून घ्या. नंतर, ते सोलून घ्या. आता उकडलेले बटाटे छान स्मॅश करून घ्या.

  • तोपर्यंत मिक्सरला २ ब्रेड स्लाईस बारीक करून घ्या. हे ब्रेड क्रंम्ब्स आता एका बाऊलमध्ये काढून घ्या.

  • त्यानंतर, बाकीचे ब्रेड स्लाईस पाण्यात बुडवा. त्यातले पाणी काढून टाका.

  • आता स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये ब्रेड स्लाईस घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा. यामध्ये ब्रेड क्रंम्ब्स मिसळा.

  • हे संपूर्ण मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर, यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि चाट मसाला मिसळा.

  • आता या मिश्रणापासून छान गोळे बनवून घ्या.

  • त्यानंतर, कढईत तेल घालून हे गोळे तळून घ्या, तुमचे गरमागरम पोटॅटो ब्रेड बॉल्स तयार आहेत.

  • पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत हे पोटॅटो ब्रेड बॉल्स सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT