how to make ribbon rice best recipe to follow  
फूड

Ribbon Rice Recipe: डाळ-भाताचा कंटाळा आला असेल तर बनवा स्वादिष्ट असा रिबन राईस

सकाळ डिजिटल टीम

भाताशिवाय जेवण म्हणजे अशक्या...अनेकांना भात खाल्याशिवाय जेवण पुर्ण झाले असं वाटतं नाही. अनेकांना दिवसातून एकदा तरी भात खायला आवडतो. वजन कमी करताना अनेकजण भात टाळण्याचा प्रयत्न करतात पण भातावर इतकं प्रेम जडलेलं असत की त्याची साथ सोडू शकत नाही. त्यामुळं भाताचे वेगवेगळे प्रकार वाचलं तरी तोंडाला पाणी सुटते.

खिचडी, जिरा राईस, फ्राईड राईस, पुलाव, व्हेज नॉनव्हेज बिर्यांणी अशा असंख्य प्रकारांची तांदळाची रेसिपी असते. अनेकवेळा रोज घरामध्ये डाळ भात खाऊन कंटाळ आला असतो मग गृहिणींकडे पर्याय असतो तो मसाले भाताचा. पण हा देखील भात खाऊन कंटाळला असाल तर स्वादिष्ट असा रिबन राईस ट्राय करा. घरातील सर्वांना आवडणारच.

तर यासाठी लागणारे साहित्य

१ किलो लांबट तांदुळ

हिरवी चटणी

१ गड्डी चिरलेली कोथिंबीर

दोन हिरव्या मिरच्या

पाच-सहा लसूण पाकळ्या

चार पालकाची पाने

मूठभर पुदिना पाने पालकाच्या पानांऐवजी (ऐच्छिक)

अर्धी वाटी टोमॅटो सॉस

दोन वाट्या मटार,

१ वाटी तिरका बारीक चिरलेला श्रावणघेवडा

दोन वाट्या किसलेली लाल दिल्ली गाजरे

५० ग्रॅम किसलेले चीज

अर्धा चमचा मिरपूड चवीनुसार मीठ.

कृती

राईस बनवण्यापूर्वी १ गड्डी चिरलेली कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, पाच-सहा लसूण पाकळ्या, चार पालकाची पाने, मूठभर पुदिना पाने किंवा पावकाची पाने हे सर्व मीठ घालून पाणी न घालता बारीक वाटणे.

त्यानंतर भात शिजवून मोकळा व गार करून घ्यावा. त्याचे तीन सारखे भाग करावेत. एका भागाला हिरवी चटणी हलक्या हाताने लावावी. दुसऱ्या भागाला अर्धी वाटी टोमॅटो सॉस हलक्या हाताने लावावे व तिसऱ्या भागाला किसलेले चीज, मीठ, मिरपूड लावावे. दोन वाट्या मटाराचे दाणे व तिरका बारीक चिरलेला श्रावणघेवडा चिमूटभर सोडा टाकून वेगवेगळा उकडून घ्यावा.

त्यानंतर जाड बुडाच्या पातेलीला १ टे. स्पून तूप लावावे. त्यावर चटणी लावलेला निम्मा भात त्यावर निम्मे मटार व फरस बी, त्यावर सॉस लावलेला भात त्यावर किसलेले गाजर त्यावर निम्मा पांढरा चीज मिसळलेला भात असे थर लावावेत. उरलेल्या साहित्याचे तसेच थर लावावेत. १ टे. स्पून तूप वरून सोडावे. मग भाताचे पातेले तव्यावर ठेवून झाकण ठेवून भाताला दणदणीत वाफ द्यावी.

टीप :

वाढताना भातवाढणी किंवा झारा उभा पातेलीत घालून तळापासून भात काढावा. म्हणजे भाताचे घातलेले थर एकावर एक रंगामुळे आकर्षक दिसतील.

आवडीनुसार इतर भाज्या रंगसंगती साधून वाफवून घालायला हरकत नाही.

टोमॅटो सॉसने पुरेसा लाल रंग आला नाही तर सॉसमधेच पाव चमचा खाण्याचा लाल रंग (रेडकोचोनेल) घालावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT