निरोगी आहार, व्यायाम, स्वतःला सक्रिय आणि हायड्रेटेड ठेवणे हे शरीरासाठी महत्त्वाचे आहे. आता जेव्हा हेल्दी डाएटचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला नाश्त्यात खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टींची नावे आठवू लागतात, त्यापैकी एक म्हणजे ओट्स.
जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात ओट्स स्मूदी घेऊ शकता. यामध्ये असलेल्या सर्व गोष्टी आरोग्यदायी असतात आणि या गोष्टी चविष्ट देखील बनवतात. ओट्सपासून बनवलेल्या चविष्ट स्मूदीची रेसिपी जाणून घेऊया.
काजू - चार ते पाच
रोल्ड ओट्स - 2 चमचे
सफरचंद - एक मध्यम आकाराचे
डेट्स- एक ते दोन
पीनट बटर - 2 चमचे
बदाम - चार ते पाच
दालचिनी पावडर
गरजेनुसार पाणी
प्रोटीन पावडर- एक चमचा किंवा स्कूप (ऑप्शनल)
हे करण्यासाठी, प्रथम ओट्स, काजू आणि बदाम वेगळे भिजवा.
मग एक सफरचंद नीट धुवून नंतर कापून घ्या.
एक ब्लेंडर घ्या आणि नंतर त्यात कट केलेले सफरचंद, भिजवलेले ओट्स, काजू, खजूर, पीनट बटर, दालचिनी पावडर घाला.
तुम्हाला पाहिजे असेल तर प्रोटीन पावडर टाकू शकता. आता गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा.
स्मूद लिक्विड तयार करा आणि नंतर ते एका कपमध्ये काढा, आता दालचिनी पावडर, काजू, बदाम आणि सफरचंदाने सजवा.
तुमची ओट्स स्मूदी नाश्त्यासाठी तयार आहे.