tea powder esakal
फूड

चहा पिता, पण त्याची पावडर कशी तयार होते माहितेय?

चहाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो

सकाळ डिजिटल टीम

"कॅमेलिया सायनोन्सिस" या झुडुपांच्या पानांपासून चहा पावडर (tea powder) बनविली जाते. चहाची (tea) लागवड कमीत कमी १०० ते १२५ से.मी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात करतात. दक्षिण चीन, आणि दक्षिणपूर्व आशिया येथे चहाचे पिक अधिक आढळते. भारतात आसाम, दार्जिलिंग, निलगिरी, डेहराडून, मणिपूर, तराई, त्रावणकोर, आदि ठिकाणी चहाचे मळे आहेत. चहाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.

जगातील जवळजवळ सर्वच चहाचे मळे १५०० मीटर्स उंचीवर डोंगर उतारावर आहेत. साधारणतः तीन फुटाच्या अंतराने लावलेली चहाची झुडुपे तीन फुटापर्यंत वाढू देतात. मग त्याचा वरचा भाग खुरडला जातो. चहाच्या झाडाची कोवळी पाने तोडण्याचे काम बहुतेक चहाच्या मळ्यात बायकाच करतात. पाने तोडल्यावर ती फॅक्टरीत आणली जातात. आणि तेथे त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात.

Assam Tea

१) विदरिंग :- खुडलेल्या पानातील पाण्याचा अंश कमी करण्यासाठी ही पाने विदरिंग रॅक्सवर पसरली जातात. सुमारे दहा ते पंधरा तास ती पंचवीस ते तीस अंश सेल्सियस तापमानाला वाळविली जातात.

२) रोलिंग: वाळलेली चहाची पाने मशिनरोलच्या सहाय्याने चुरडली जातात. या प्रक्रियेमुळे पानातील रस पानाच्या पृष्ठभागावर जमा होतो.

३) ऑक्सिडेशन: या प्रक्रियेमध्ये पानांवर ऑक्सिजन सोडला जातो. तो पानांमध्ये शोषला जाऊन पानांना विशिष्ट रंग येतो. ऑक्सिडेशनच्या कमी अधिक प्रमाणानुसार पानांचे हिरवा, का़ळा हिरवट तांबूसा असे रंग मिळतात.

४) फायरिंग: या प्रक्रियेत ऑक्सिडेशन केलेला पानाचा भुगा गरम हवेच्या झोताखालून फिरवत खूप तापविला जातो. त्यामुळे पाण्याचा राहिलेला अंश पूर्ण शोषला जाऊन चहापावडर काळी पडते.

५) सॉर्टिंग :- वरील चार प्रक्रियांमधून बाहेर पडलेली पावडर वेगवेगळ्या चालण्यांमधून सरकवली जाते. आणि शेवटी पावडरीच्या जाडीनुसार वेगवेगळ्या पेट्यात भरली जाते.

tea

साधारणतः शंभर किलो चहाच्या पानांपासून वीस किलो चहापावडर तयार होते. नंतर चहाचा दर्जा ठरवण्याचे काम टेस्टरला करावे लागते. चहाचा रंग, चव, वास यानुसार चहाची प्रत ठरवली जाते. चहाची किंमत ठरवण्यासाठी चहाचा लिलाव केला जातो. जगभरात एकूण तेरा ठिकाणी ही लिलाव केंद्र आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

SCROLL FOR NEXT