National Watermelon Day Sakal
फूड

National Watermelon Day: कलिंगडाच्या रसाचा आहारात समावेश केल्यास दिवसभर राहाल उत्साही

Watermelon Juice Recipe: कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते. यामुळे कलिंगडाचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात.

पुजा बोनकिले

Watermelon Juice Recipe: कलिंगडाचे फायदे आणि वैशिष्ट्य सांगण्यासाठी दरवर्षी ३ ऑगस्टला राष्ट्रीय कलिंगड दिवस साजरा केला जातो. कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते तसेच त्वचेसाठी देखील हे फळ फायदेशीर असते.

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण आणि फायबर खुप असते आणि कॅलरी कमी असते. यामुळे वजन नियत्रंणात ठेवण्यास मदत करते. कलिंगडाचा रस प्यायल्याने दिवसभर उत्साही राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया सोप्या पद्धतीने घरी कलिंगडाचा रस कसा बनवायचा.

कलिंगडाचा रस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कलिंगड - १

पुदिन्याचे पान- ४-५

काळे मीठ - १-२ चमचे

साखर- १ चमचा

लिंबू- १-२

बर्फाचे तुकडे - २-३

कलिंगडाचा रस बनवण्याची कृती

कलिंगडाचा रस बनवण्यासाठी सर्वात आधी कलिंगड स्वच्छ धुवावे. नंतर त्याच्या छोट्या फोडी करून त्यातील बीया काढून टाकाव्या. नंतर मिक्सरमध्ये पुदिन्याचे पाने, काळे मीठ,साखर, कलिंगडाचे तुकडे टाकून बाकिक करून घ्यावे. नंतर एका मोठ्या चाळणीतून गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकावा. नंतर सर्व्ह करताना बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याचे पान टाकावे.

कलिंगडाचा रस पिण्याचे फायदे

कलिंगडाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. तसचे यामध्ये असलेले फायबर आतडे निरोगी ठेवते. तसेच ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना हा रस पिल्यास समस्या कमी होते. अॅसिडिटीचा त्रास कमी होते. तसेच चेहरा चमकदार बनतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT