Break Fast Recipe esakal
फूड

Break Fast Recipe : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी अन् चटपटीत इडली चाट

रोज तेच ते पदार्थ नाश्त्याला खाऊन कंटाळा आला की, त्याच पदार्थांना थोडा वेगळा फ्लेवर देता आला तर नाश्त्याला मजा येते.

सकाळ डिजिटल टीम

Idli Chaat Recipe : लहान मुलांना काय अन् मोठ्यांना काय इटली सर्वांनाच आवडते. त्यात जर इडलीने बनवलेलं चाट असेल तर मग विचारायलाच नको! रोज तेच ते पदार्थ नाश्त्याला खाऊन कंटाळा आला की, त्याच पदार्थांना थोडा वेगळा फ्लेवर देता आला तर नाश्त्याला मजा येते.

इडली चाट बनवणं फार सोपं आहे. झटपट आणि हेल्दी रेसिपी तोंडाला चव आणते आणि दिवसाचा मूड पण बनवते.

साहित्य

रवा - १ कप, दही - १ कप, काजू ८-१०, हिरवी मिरची -२, कढीपत्ता ८-१०, मोहरी, हरभरा डाळ - १ टी स्पून, बेकींग सोडा - १ चिमूट, लाल तिखट - अर्धा टी स्पून, तेल - १ टेबल स्पून, मीठ चवीनुसार.

चिरलेला कांदा - १ टेबल स्पून, टोमॅटो - १ टेबल स्पून, हिरवी चटणी - २ टेबल स्पून, मसाला दही - १ कप, चिंचेची चटणी - २ टेबल स्पून, डाळींब दाणे - १ टेबल स्पून, शेव - पाव कप.

कृती

  • एका भांड्यात रवा आणि दही मिक्स करून घ्या. यात मीठ घाला. अर्धा तास बाजूला ठेवा. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, मिरची, कढापत्ता टाकून परता. त्यानंतर काजू टाकून ते गोल्डन होईपर्यंत रोस्ट करा.

  • आता हे तयार मिश्रण रव्याच्या बॅटरमध्ये घाला. थोडं पाणी घालून फेटून घ्या. १ चिमूट बेकींग सोडा टाका. इडली पात्रात इडल्या वाफवायला ठेवा. १०-१५ मिनीटांनी इडली तयार झाल्यावर त्या एका भांड्यात काढा.

  • नंतर एका कढईत मोहरी, कढीपत्ता, हरभरा डाळ, लाल तिखट टाकून परतून घ्या. नंतर इडलीचे ४-५ तुकडे करून त्यात घाला. नीय परतून झाल्यावर गॅस बंद करा. वरून दही घालून त्यावर चिंचेची चटणी, हिरवी चटणी, चिरलेला कांदा, टोमॅटो घाला. वरून पुन्हा दही घाला. शेवटी डाळींबाचे दाणे टाकून गार्निशींग करा. आणि तुमचे इडली चाट तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT