Idli Pizza Recipe: Sakal
फूड

Idli Pizza Recipe: सकाळी नाश्त्यात चवदार अन् चटपटीत खायचे असेल तर १० मिनिटांत बनवा 'इडली पिझ्झा', जाणून घ्या रेसिपी

Idli Pizza Recipe: सकाळी नाश्त्यात रोज इडली खाऊन बोरं झाले असाल तर इडली पिझ्झा बनवू शकता. लहान मुले देखील आवडीने खातील. जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत कोणती आहे.

पुजा बोनकिले

सकाळ साप्ताहिक

Idli Pizza Recipe: सकाळी नाश्त्यात रोज इडली खाऊन बोरं झाले असाल तर सकाळी नाश्त्यात इडली पिझ्झा बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने इडली पिझ्झा खातील. तुम्हालाही पिझ्झा खायला आवडत असेल तर इडली पिझ्झा बनवू शकता. हा पिझ्झा बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया इडली पिझ्झा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

इडली पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक वाटी उडीद डाळ

१ टीस्पून मेथी दाणे

अर्धा वाटी बारीक रवा

सैंधव

लहान टोमॅट

सिमला मिरची

कोबी

फ्लॉवर बारीक चिरून

बारीक चिरलेली कोथिंबीर

चीज

इडली पिझ्झा बनवण्याची कृती

पदार्थ करण्याच्या आदल्या दिवशी सकाळी उडीद डाळ धुवून, मेथीदाणे घालून बेताच्या पाण्यात भिजवावी. रात्री त्याच पाण्यात वाटावी. फेटून झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सैंधव व रवा घालून फेटून अर्धा तास झाकून ठेवावे. थाळीत आतून तेलाचा हात लावून मिश्रण ओतावे. कुकरमध्ये शिटी न लावता पंधरा मिनिटे वाफवावे. हा झाला पिझ्झा बेस. सर्व भाज्या बारीक कापून त्याची एकत्रित भाजी आधीच करून ठेवावी. शिजलेली भाजी बेसवर पसरावी. वर चीज किसून घालावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawr : रोहित तू थोडक्यात वाचलास, अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT